Home Bibles 1 शमुवेल 23:9 · मराठी बायबल
1 शमुवेल 23:9 · मराठी बायबल

शौलची आपल्याविरुध्द मसलत चाललेली आहे हे दावीदला कळले. तेव्हा दावीदाने अब्याथार याजकाला एफोद आणण्याच सांगितले.

Cross references

गणना 27:21

जर यहोशवाला काही निर्णय घ्यायचे असतील तर तो याजक एलाजारकडे जाईल. एलाजार उरीमचा उपयोग करुन परमेशवराचे उत्तर माहीत करुन घेईल. नंतर यहोशवा आणि इस्राएलचे सर्व लोक देवाच्या सांगण्याप्रमाणे करतील. जर तो म्हणेल की, ‘युद्ध करा,’ तर ते युद्ध करतील. आणि त्याने सांगितले की ‘घरी जा’, तर ते घरी जातील.”

1 शमुवेल 10:22

त्यांनी परमेश्वराला विचारले, “शौल इथे आला आहे का?”परमेश्वर म्हणाला, “शौल कोठारामागे लपून बसला आहे.”

1 शमुवेल 14:18

शौल अहीयाला म्हणाला, “परमेश्वराचा पवित्रकरारकोश आण” (त्यावेळी देवाचा हा पवित्र करारकोश इस्राएलांजवळ होता.)

1 शमुवेल 22:20

पण त्यातून अब्याथार हा अहीमलेखचा मुलगा निसटला. अहीमलेख हा अहीटूबचा मुलगा. अब्याथार पळून जाऊन दावीदाला मिळाला.

1 शमुवेल 23:6

(अब्याथार दावीदाकडे पळून आला तेव्हा त्याने आपल्याबरोबर एफोद आणाला होता.)

1 शमुवेल 30:7

अब्याथार या याजकाला त्याने आपला एफोद आणण्यास सांगितले.

यिर्मया 11:18

अनाथोथचे लोक माझ्याविरुद्ध कट करीत असल्याचे परमेश्वराने मला दाखविले. परमेश्वराने मला ते करीत असलेल्या गोष्टी दाखविल्या, त्यावरुन ते माझ्याविरुद्ध असल्याचे कळले.

यिर्मया 33:3

“यहूदा, माझा धावा कर. मी ओ देईन. मी तुला महत्वाची रहस्ये सांगीन. ह्या गोष्टी तू पूर्वी कधीच ऐकल्या नसशील.

प्रेषितांचीं कृत्यें 9:24

यहूदी रात्रंदिवस शहराच्या वेशीवर पहारा देत होते. व शौलाला पकडण्याची वाट पाहत होते. त्यांना शौलाला ठार मारायचे होते, पण त्यांचा हा बेत शौलास समजला.

प्रेषितांचीं कृत्यें 14:6

जेव्हा पौल व बर्णबा यांना त्याविषयी कळले तेव्हा त्यांनी ते शहर सोडले. ते लुम्र व दर्बे या लुकवनियाच्या नगरात गेले. आणि त्या शहरांच्या सभोवतालच्या परिसरात गेले.

प्रेषितांचीं कृत्यें 23:16

पण पौलाच्या बहिणीच्या मुलाने या सर्व गोष्टी ऐकल्या व तो किल्ल्यात गेला. त्याने पौलाला सर्व काही सांगितले,

Interlinear

Choose Theme