Home Bibles यिर्मया 11:18 · मराठी बायबल
यिर्मया 11:18 · मराठी बायबल

अनाथोथचे लोक माझ्याविरुद्ध कट करीत असल्याचे परमेश्वराने मला दाखविले. परमेश्वराने मला ते करीत असलेल्या गोष्टी दाखविल्या, त्यावरुन ते माझ्याविरुद्ध असल्याचे कळले.

Cross references

1 शमुवेल 23:11

खरोखरच शौल येथे येईल का? येथील लोक मला शौलच्या हवाली करतील का? इस्राएलच्या परमेश्वर देवा, तुझ्या सेवकाला नीट सांग.”

1 शमुवेल 23:12

पुन्हा दावीदाने विचारले, “कईलाचे लोक मला आणि माझ्या साथीदारांना शौलच्या ताब्यात देतील का?” परमेश्वराने याचेही होय असे उत्तर दिले.

2 राजे 6:9

पण संदेष्टा अलीशा याने इस्राएलच्या राजाला निरोप पाठवून सांगितले, “सावधगिरीने वागा. त्या ठिकाणी जाऊ नका. येथे अरामी सैन्य लपून बसले आहे.

2 राजे 6:14

मग अरामच्या राजाने घोडे, रथ आणि बरेचसे सैन्य दोथान कडे रवाना केले. ते रात्री तेथे पोचले आणि त्यांनी नगराला वेढा घातला.

2 राजे 6:32

राजाने अलीशाकडे एक दूत पाठवला. अलीशा आपल्या घरात बसला होता आणि गावातील वडीलधारी मंडळी त्याच्या बैठकीत होती. हा दूत तेथे पोचण्यापूर्वी अलीशा त्या लोकांना म्हणाला, “हे बघा, तो इस्राएलचा घातकी राजा माझा शिरच्छेद करण्यासाठी माणसे पाठवत आहे. तेव्हा आता दूत येईल तेव्हा दार लावून घ्या. त्याला अजिबात आत येऊ देऊ नका. त्याच्या मागेमाग त्याच्या स्वामीच्या पावलांची चाहूल मला लागली आहे!”

यिर्मया 11:19

लोक माझ्याविरुद्ध असल्याचे समजण्यापूर्वी मी कत्तल होण्याची वाट पाहणाऱ्या गरीब कोकरासारखा होतो. ते माझ्याविरुद्ध आहेत याची मला कल्पना नव्हती. “आपण या झाडाचा आणि त्याच्या फळांचा नाश करु. आपण त्याला मारुन टाकू म्हणजे लोक त्याला विसरतील” असे ते माझ्याबद्दल म्हणत.

यहेज्केल 8:6

मग देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलचे लोक किती भयानक गोष्टी करीत आहेत, हे तू पाहतोस ना? त्यांनी ही गोष्ट अगदी माझ्या मंदिरालगत उभी केली. आणि जर तू माझ्याबरोबर आलास, तर तुला आणखी भयानक गोष्टी दिसतील.”

मत्तय 21:3

जर कोणी तुम्हांला विचारले की, ही गाढवे कशासाठी नेत आहात तर त्याला सांगा की, येशूला यांची गरज आहे. तो ती लगेच माझ्याकडे पाठवील.”

रोमकरांस 3:7

परंतु तुम्ही असे म्हणाला की, “जर देवाचा खरेपणा माझ्या खोटेपणामुळे त्याच्या गौरवासाठी उठून दिसत असेल, तर मग मी पापी का गणला जातो?”

Interlinear

Choose Theme