त्यांच्या सर्व पापांची क्षमा कर. तुझ्या विरुध्द गेल्याबद्दल त्यांना क्षमा कर. त्यांच्या शत्रूंमध्ये त्यांच्या बद्दल दया उत्पन्न कर.
Cross references
तुम्ही परमेश्वराकडे परत फिरलात तर ज्याने तुमच्या भाऊबंदांना आणि लेकरांना कैद करुन नेले त्यांना दयेचा पाझर फुटेल आणि तुमचे भाऊबंद आणि लेकरे आपल्याकडे परत येतील. परमेश्वर तुमचा देव दयाळू आणि कृपाळू आहे. त्याच्या आसऱ्याला गेलात तर तो तुमचा धिक्कार करणार नाही.
त्याने देवाची प्रार्थना केली व मदतीसाठी याचना केली. मनश्शेचा धावा ऐकून परमेश्वराला त्याची दया आली. म्हणून त्याला पुन्हा यरुशलेमला आणून परमेश्वराने त्याला गादीवर बसवले. परमेश्वर हाच खरा देव आहे हे तेव्हा मनश्शेला पटले.
एज्रा बाबेलहून यरुशलेमला आला. एज्रा अध्यापक होता. मोशेच्या नियमशास्त्रात तो चांगला पारंगत होता. इस्राएलचा देव परमेश्वर याने हे मोशेचे नियमशास्त्र दिले. एज्राला परमेश्वराची साथ असल्यामुळे राजा अर्तहशश्तने त्याला हवे ते सर्व देऊ केले.
आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याला धन्यवाद! यरुशलेममधील परमेश्वराच्या मंदिराचा जीर्णीध्दार करावा अशी इच्छा परमेश्वरानेच राजाच्या मनात निर्माण केली.
तेव्हा, हे परमेश्वरा, माझी विनवणी कृपा करुन ऐक. मी तुझा सेवक आहे. तुझ्या नावाविषयी भीतियुक्त आदर दाखवण्याची इच्छा असलेल्या तुझ्या सेवकांची ही प्रार्थना तू ऐकावीस. मी राजाचा मद्य चाखणारा सेवकआहे, हे परमेश्वरा, तुला हे माहीत आहेच. तेव्हा कृपा करून आज माझ्या मदतीला ये. राजाजवळ मी मदतीची करीन तेव्हा मला साहाय्य कर. मला यश दे आणि राजाची मर्जी राखण्यात मला मदत कर.
यावर राजा मला म्हणाला, “तुझ्यासाठी मी काय करावे असे तुला वाटते?”उत्तर देण्यापूर्वी मी स्वर्गातील देवाची प्रार्थना केली.
परंतु नंतर मी परमेश्वरा पुढे माझे अपराध कबूल करण्याचा निर्णय घेतला. परमेश्वरा, मी तुला माझे अपराध सांगितले. आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस.
इतर देशांनी त्यांना कैदी बनवले पण देवाने त्यांना त्याच्या माणसांशी दयाळू राहायला सांगितले.
जर एखादा माणूस चांगले आयुष्य जगत असेल, परमेश्वराला खुष करत असेल तर त्या माणसाचे शत्रूदेखील त्याच्याबरोबर शांतता राखतील.
देवाने अश्पनजला दानीएलशी चांगले व दयेने वागण्याची बुध्दी दिली.
योसेफावर तेथे खूप संकटे आली पण देवाने त्याला सर्व संकटांतून सोडविले, देवाने योसेफाला ज्ञान व शहाणपण दिले. त्यामुळे इजिप्तचा राजा, फारो, याची मर्जी योसेफाला संपादन करता आली. फारोने योसेफाला इजिप्त देशावर व त्याच्या घरावर अधिपती म्हणून नेमले.