Home Bibles 1 राजे 2:25 · मराठी बायबल
1 राजे 2:25 · मराठी बायबल

राजा शलमोनाने मग बनायाला आज्ञा दिली आणि बनायाने बाहेर जाऊन अदोनीयाला ठार केले.

Cross references

शास्ते 8:20

मग गिदोन आपल्या येथेर या ज्येष्ठ पुत्राला म्हणाला, “या राजांना मारुन टाक” पण येथेर पोरसवदा असल्यामुळे घाबरला. त्याला त्यांच्यावर तलवार चालवायचा धीर होईना.

शास्ते 15:12

त्यावर ते लोक शमशोनला म्हणाले, “आम्ही तुझ्या मुसक्या बांधून तुला पलिष्ट्यांच्या स्वाधीन करायला आलो आहोत.”शमशोन म्हणाला, “तुम्ही स्वत: मला इजा करणार नाही एवढा शब्द तुम्ही मला द्या.”

1 शमुवेल 15:33

पण शमुवेल अगागला म्हणाला, “तुझ्या तलवारीने तू मुलांना आई वेगळे केलेस. आता तुझ्या आईची गतीही तशीच होईल.” आणि त्याने गिलगाल येते परमेश्वरासमोर अगागचे तुकडे तुकडे केले.

2 शमुवेल 1:15

पुढे दावीद त्याला म्हणाला, “तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार आहेस. परमेश्वराच्या अभिषिक्त राजाला आपण मारले असे तू बोलून चुकला आहेस. तू अपराधी आहेस याची तूच आपल्या तोंडाने साक्ष दिली आहेस.” दावीदाने मग आपल्या एका तरुण सेवकाला बोलावून या अमालेक्याचा वध करण्यास फर्मावले. त्याप्रमाणे त्या इस्राएली तरूणाने अमालेक्याला मारले.

2 शमुवेल 4:12

असे म्हणून दावीदाने आपल्या तरुण सैनिकांना रेखाब आणि बाना यांना ठार करायची आज्ञा दिली. तेव्हा या तरुणांनी त्यांचे हात पाय तोडून त्यांना हेब्रोन येथील तळ्यापाशी टांगले. मग हेब्रोन येथे अबनेरच्या कबरीजवळच त्यांनी ईश-बोशेथच्या मस्तकाचे दफन केले.

2 शमुवेल 8:18

यहोयादचा मुलगा बनाया हा करेथी आणि पलेथीयांचा प्रमुख होता. दावीदाची मुले महत्वाचे नेते होते.

2 शमुवेल 12:10

तेव्हा आता ही तलवार तुझ्या कुटुंबाचा पिच्छा सोडणार नाही. तू उरीया हित्तीच्या बायकोचे हरण केलेस. तुला माझी पर्वा नाही हेच यातून दिसते.’

1 राजे 2:31

तेव्हा राजाने बनायाला हुकुम केला, “तो म्हणतो तसे कर त्याला तिथेच ठार कर. मग त्याचे दफन कर. म्हणजे मग आमच्या घराण्यावरचा यवाबाचा कलंक पुसला जाईल. यवाबाने निरपराधांची हत्या केली तो हा कलंक होय.

1 राजे 2:34

तेव्हा यहोयादाचा मुलगा बनाया याने यवाबाला ठार केले व वाळवंटातील त्याच्या घराजवळ त्याचे दफन करण्यात आले.

1 राजे 2:46

मग राजाने बनायाला शिमीचा वध करायची आज्ञा दिली आणि बनायाने ती अंमलात आणली. आता शलमोनाची आपल्या राज्यावर पूर्ण पकड बसली.”

Interlinear

Choose Theme