Home Bibles 2 शमुवेल 4:12 · मराठी बायबल
2 शमुवेल 4:12 · मराठी बायबल

असे म्हणून दावीदाने आपल्या तरुण सैनिकांना रेखाब आणि बाना यांना ठार करायची आज्ञा दिली. तेव्हा या तरुणांनी त्यांचे हात पाय तोडून त्यांना हेब्रोन येथील तळ्यापाशी टांगले. मग हेब्रोन येथे अबनेरच्या कबरीजवळच त्यांनी ईश-बोशेथच्या मस्तकाचे दफन केले.

Cross references

अनुवाद 21:22

“एखाद्याचा अपराध मुत्युदंड मिळण्याइतका मोठा असेल. अशावेळी त्याच्या देहान्ता नंतर लोक त्याचे प्रेत झाडाला टांगतील.

2 शमुवेल 1:15

पुढे दावीद त्याला म्हणाला, “तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार आहेस. परमेश्वराच्या अभिषिक्त राजाला आपण मारले असे तू बोलून चुकला आहेस. तू अपराधी आहेस याची तूच आपल्या तोंडाने साक्ष दिली आहेस.” दावीदाने मग आपल्या एका तरुण सेवकाला बोलावून या अमालेक्याचा वध करण्यास फर्मावले. त्याप्रमाणे त्या इस्राएली तरूणाने अमालेक्याला मारले.

2 शमुवेल 21:9

या सात जणांना त्याने गिबोन्यांच्या स्वाधीन केले. गिबोन्यांनी त्यांना गिबा डोंगरावर परमेश्वरासमोर फाशी दिले. ते सातजण एकदमच प्राणाला मुकले. त्यांना ठार केले गेले ते दिवस हंगामाच्या सुरुवातीचे होते. जवाच्या पिकाच्या सुरुवातीचा तो (वसंतातील) काळ होता.

स्तोत्रसंहिता 55:23

तू तुझ्या चिंता परमेश्वराकडे सोपव आणि तो तुझी काळजी घेईल. परमेश्वर चांगल्या लोकांचा कधीही पराभव होऊ देणार नाही. [24] देवा, त्या खोटारड्या आणि खुनी माणसांना त्यांचे आयुष्य अर्धे राहिलेले असतानाच त्यांच्या थडग्यात पाठव आणि माझे म्हणशील तर, माझा तुझ्यावर भरंवसा आहे.

मत्तय 7:2

कारण ज्या न्यायाने तुम्ही इतरांचा न्याय करता त्याचा न्यायाने तुमचा न्याय केला जाईल, आणि ज्या मापाने तुम्ही माप घालता त्याच मापाने तुम्हांला परत माप घालतील.

Interlinear

Choose Theme