Home Bibles 2 शमुवेल 1:15 · मराठी बायबल
2 शमुवेल 1:15 · मराठी बायबल

पुढे दावीद त्याला म्हणाला, “तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार आहेस. परमेश्वराच्या अभिषिक्त राजाला आपण मारले असे तू बोलून चुकला आहेस. तू अपराधी आहेस याची तूच आपल्या तोंडाने साक्ष दिली आहेस.” दावीदाने मग आपल्या एका तरुण सेवकाला बोलावून या अमालेक्याचा वध करण्यास फर्मावले. त्याप्रमाणे त्या इस्राएली तरूणाने अमालेक्याला मारले.

Cross references

शास्ते 8:20

मग गिदोन आपल्या येथेर या ज्येष्ठ पुत्राला म्हणाला, “या राजांना मारुन टाक” पण येथेर पोरसवदा असल्यामुळे घाबरला. त्याला त्यांच्यावर तलवार चालवायचा धीर होईना.

1 शमुवेल 22:17

राजाने मग आपल्या जवळच्या रक्षकांना हुकूम केला, “परमेश्वराच्या याजकांना ठार करा. त्यांनी दावीदाची बाजू घेतली म्हणून त्यांना ही सजा आहे. दावीदाच्या पलायनाची त्यांना खबर असून त्यांनी मला तसे कळवले नाही.”पण राजाच्या सेवकांनी परमेश्वराच्या याजकांवर शस्त्र उगारायला नकार दिला.

2 शमुवेल 4:10

यापूर्वीही एकदा आपण चांगली बातमी आणली आहे असे वाटून एकाने मला सांगितले, पाहा शौल मेला त्याला वाटले या बातमीबद्दल मी त्याला बक्षीस देईन पण मी त्याला धरून सिकलाग येथे ठार केले.

1 राजे 2:25

राजा शलमोनाने मग बनायाला आज्ञा दिली आणि बनायाने बाहेर जाऊन अदोनीयाला ठार केले.

1 राजे 2:34

तेव्हा यहोयादाचा मुलगा बनाया याने यवाबाला ठार केले व वाळवंटातील त्याच्या घराजवळ त्याचे दफन करण्यात आले.

1 राजे 2:46

मग राजाने बनायाला शिमीचा वध करायची आज्ञा दिली आणि बनायाने ती अंमलात आणली. आता शलमोनाची आपल्या राज्यावर पूर्ण पकड बसली.”

ईयोब 5:12

देव धूर्तांचे कार्य बंद पाडतो आणि त्यांना सफलता मिळू देत नाही.

नीतिसूत्रे 11:18

दुष्ट माणूस दुसऱ्यांना फसवतो आणि त्यांचे पैसे घेतो. पण जो माणूस न्याची आहे आणि जो योग्य गोष्टी करतो त्याला फलप्राप्ती होते.

Interlinear

Choose Theme