अदोनीया म्हणाला, “एक काळ असा होता की हे राज्य माझे होते. तुम्हाला हे माहीत आहे. मी राजा आहे अशीच इस्राएलच्या सर्व लोकांची भावना होती. पण पुढे सगळे बदलले. आता माझा भाऊ गादीवर आहे. परमेश्वरानेच त्याची निवड केली आहे.
Cross references
“तुझे जीवन संपुष्टात आले म्हणजे मृत्यूनंतर तुझ्या पूर्वजांशेजारी तुझे दफन होईल. पण मी तुझ्या मुलांपैकीच कोणालातरी राजा करीन.
दावीदाने मग आपली बथशेबा हिचे सांत्वन केले. तिच्याशी त्याने शरीर संबंध केला. बथशेबा पुन्हा गरोदर राहिली. तिला दुसरा मुलगा झाला. दावीदाने त्याचे नाव शलमोन ठेवले. शलमोनावर परमेश्वराचा लोभ होता.
राजा दावीदाकडे न्याय मागण्यासाठी आलेल्या सर्व इस्राएलांना तो असेच वागवी. असे वागून त्याने सर्व इस्राएलांची मने जिंकली.
एकाने दावीदाकडे येऊन वर्तमान सांगितले की इस्राएलच्या लोकांचा कल अबशालोमकडे झुकत आहे.
हूशय म्हणाला, “परमेश्वर ज्याची निवड करेल त्याला माझा पाठिंबा आहे. या आणि इस्राएल लोकांनी आपली निवड केली आहे. म्हणून मी तुमच्या बाजूचा आहे.
अदोनीया हा दावीद आणि त्यांची पत्नी हग्गीथ यांचा मुलगा. गर्वाने फुगून जाऊन त्याने स्वत : राजा व्हायचे ठरवले. राजा व्हायच्या प्रबळ इच्छेने त्याने स्वत:साठी एक रथ, घोडे आणि रथापुढे धावायला पन्नास माणसे तयार केली.
कारण आजच त्याने खाली खोऱ्यात जाऊन गुरे मेंढरे कापून शांत्यर्पणाचा यज्ञ केला आहे तुमची मुले, सेनापती, अब्याथार याजक यांना त्याचे आमंत्रण आहे. ते सगळे आत्ता त्याच्याबरोबर खाण्यापिण्यात दंग आहेत. ‘राजा अदोनीया चिरायु होवो’ म्हणून घोषणा देत आहेत.
सादोक याजकाने पवित्र मंडपातून तेल आणले. आणि त्या तेलाने सादोकने शलमोनाच्या मस्तकावर अभिषेक केला. त्यांनी कर्णा फुंकला आणि सर्वांनी “शलमोन राजा चिरायू होवो” असा एकच जयजयकार केला.
मात्र तुझा मुलगा शांतताप्रिय आहे. मी त्याच्या कारकिर्दीत शांतता लाभू देईन. त्याचे शत्रू त्याला त्रास देणार नाहीत. त्याचे नाव शलमोन म्हणजे शांतताप्रिय असेल. इस्राएलला त्याच्या काळात शांतता आणि स्वस्थता लाभेल.
तो माझ्याप्रीत्यर्थ मंदिर उभारील. तो माझा पुत्र आणि मी त्याचा पिता होईन त्याचे राज्य मी बळकट करीन. इस्राएलवर त्याच्या वंशजा पैकी एकजण सर्वकाळ राज्य करील.”
देवाने मला भरपूर पुत्रसंतती दिली आहे. या मुलांमधून परमेश्वराने शलमोनला माझा उत्तराधिकारी म्हणून निवडले आहे. पण खरे पाहता इस्राएल हे परमेश्वराचेच राज्य आहे.
परमेश्वर ज्याच्या विरुद्व आहे अशी योजना यशस्वी करुन दाखविणारा एकही शहाणा माणूस नाही.
मी ही पृथ्वी व त्यावरील सर्व माणसे निर्माण केली. मी पृथ्वीवर सर्व प्राणी निर्माण केले. मी माझ्या प्रचंड सामर्थ्याच्या साहाय्याने आणि बळकट हाताने हे निर्माण केले. मी मला पाहिजे त्याला ही पृथ्वी देईन.
समजण्यास अतिशय कठीण असलेली, गुप्त रहस्ये त्याला माहीत असतात. प्रकाश त्याच्याबरोबर असल्यामुळे, अंधारात आणि गुप्त जागी काय आहे ते त्याला कळते.