“तुझे जीवन संपुष्टात आले म्हणजे मृत्यूनंतर तुझ्या पूर्वजांशेजारी तुझे दफन होईल. पण मी तुझ्या मुलांपैकीच कोणालातरी राजा करीन.
Cross references
परमेश्वर अब्रामाशी बोलला, तो म्हणाला, “तुझे सर्वकाही त्या तुझ्या गुलामाला मिळणार नाही; तर तुला मुलगा होईलआणि तोच तुझ्या सगळ्या मालमत्तेचा वारस होईल.”
तो मोशेला म्हणाला, “तू आता लौकरच मरण पावशील व आपल्या पूर्वजांना भेटशील. तेव्हा हे लोक माझ्यापासून परावृत होतील. ते माझ्याशी केलेला पवित्र करार मोडतील. माझी साथ सोडून त्या देशातील इतर खोट्या दैवतांची पूजा करायला लागतील.
परमेश्वर राजाला युध्दात विजयी करतो. आपल्या अभिषिक्त राजाबद्दल परमेश्वर खरे प्रेम दाखवतो. दावीद आणि त्याचे वंशज यांचे तो निरंतर कल्याण करील.
आपण प्राण सोडण्यापूर्वी नीट व्यवस्था केली पाहिजे. तसे तुम्ही केले नाहीत तर तुमचे आपल्याचा वाडवडीलांच्या शेजारी दफन झाल्यावर मी आणि शलमोन लोकांच्या दृष्टीने गुन्हेगार ठरु.”
दावीद राजाचा मरणकाळ जवळ येऊन ठेपला होता. तेव्हा त्याने शलमोनाला जवळ बोलवून सांगितले,
मग दावीद मरण पावला. दावीद नगरात त्याचे दफन झाले.
“परमेश्वराने अशा पध्दातीने आपले वचन खरे करुन दाखवले आहे. आता माझ्या वडीलांच्या गादीवर मी आलो आहे. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे इस्राएल लोकांवर माझी सत्ता आहे. इस्राएलच्या परमेश्वर देवासाठी हे मंदिरही मी बांधले आहे.
तुझ्या मृत्यूनंतर तू आपल्या पूर्वजांच्या रांगेत जाऊन बसलास की तुझ्या मुलालाच मी राजा करीन. तुझाच मुलगा राजा होईल. त्याचे राज्य मी बळकट करीन.
पण ते तू बांधू शकत नाहीस पण तुझा मुलगा हे काम करील.’
दावीद याला दिलेले वचन तू पाळलेस. दावीद माझे वडील होते. तू आपल्या मुखानेच त्यांना वचन दिलेस आणि आज आपल्या हाताने ते प्रत्यक्षात आणले आहेस.
त्याचा वंश सदैव चालू राहील. स्वर्ग असेपर्यंत त्याचे राज्य असेल.
परमेश्वराने दावीदाला वचन दिले. परमेश्वराने दावीदाशी प्रामाणिक राहाण्याचे वचन दिले. राजे दावीदाच्या कुटुंबातूनच येतील असे वचन परमेश्वराने दिले.
त्याच्या राज्यात सामर्थ्य आणि शांती नांदेल. आणि दाविदच्या वंशाच्या ह्या राजाच्या काळात ती वाढतच जाईल. हा राजा सदासर्वकाळ सदाचार आणि प्रामाणिक न्यायबुध्दीने राज्य करील.सर्वशक्तिमान परमेश्वराला त्याच्या लोकांबद्दल अतिशय प्रेम आहे. ह्या प्रेमापोटीच ह्या सर्व गोष्टी घडून येतील.
इशायाच्या बुंध्याला (वंशाला) अंकुर (मूल) फुटून वाढू लागेल. ती फांदी इशायाच्या मुळाची असेल.
त्या वेळेला इशायाच्या घराण्यात एक विशेष व्यक्ती असेल ती व्यक्ती ध्वजाप्रमाणे असेल हा “ध्वज” सर्व राष्ट्रांना त्याच्याभोवती जमण्याचे आवाहन करील. सर्व राष्ट्रे, त्यांनी करायच्या कार्याबद्दल ह्या ‘ध्वजाकडे’ विचारणा करतील तो जेथे असेल तेथे वैभव नांदेल.
परमेश्वर म्हणतो, “दावीदाच्या घराण्यातील माणूस नेहमीच सिंहासनावर बसेल व इस्राएलवर राज्य करील.
पृथ्वीवरील खूप मृत व पुरलेले उठतील. काहींना चिरंजीवित्व लाभेल पण काहींना कायमची अप्रतिष्ठा व तिरस्कार लाभेल.
येशू म्हणाला, ख्रिस्ताविषयी तुमचे काय मत आहे? तो कोणाचा पुत्र आहे?” परूश्यांनी उत्तर दिले, ख्रिस्त हा दाविदाचा पुत्र आहे.”
दावीद हा संदेष्टाहोता. आणि देव जे काही बोलला ते त्याला माहीत होते. दावीदाला देवाने अभिवचन दिले की, तो त्याच्याच घराण्यातून एका व्यक्तीला त्याच्या राजासनावर बसवील.
ज्या काळात दाविद राहत होता तेव्हा त्याने देवाच्या इच्छेप्रमाणे केले. मग तो मेला. आपल्या वाडवडिलांशेजारी त्याला पुरले. आणि कबरेत त्याचे शरीर कुजले
पाहा! मी तुम्हांला एक रहस्यमय सत्य सांगत आहे. आपण सर्व मरणार नाही. आपण सर्व बदलून जाऊ.
कारण जर आम्ही विश्वास ठेवतो की येशू मेला होता आणि नंतर मरणातून पुन्हा जिवंत झाला, तसेच देवही येशूबरोबर, त्याच्यावर (येशूवर) विश्वास ठेवून मेलेले आहेत, त्यांना त्याप्रमाणे परत जिवंत करील.