Home Bibles 1 इतिहास 5:22 · मराठी बायबल
1 इतिहास 5:22 · मराठी बायबल

बरेच हग्री लोक मारले गेले कारण देवाने रऊबेनींना लढाई जिंकायला मदत केली. यानंतर मनश्शे, रऊबेन आणि गाद लोक हग्री लोकांच्या भूप्रदेशात राहू लागले. बाबिलोन लोकांनी इस्राएलांवर विजय मिळवून त्यांना कैद करुन नेईपर्यंत हे लोक तिथेच राहिले.

Cross references

उत्पत्ति 49:19

“लुटारुंची टोळी” गाद वर हल्ला करेल, परंतु तो त्यांना पळवून लावील.”

यहोशवा 23:10

परमेश्वराच्या साहाय्याने, एक इस्राएल माणूस शत्रूच्या हजार सैनिकांना सळो की पळो करु शकतो. कारण खुद्द तुमचा परमेश्वर देवच तुमच्या वतीने लढतो. असे करायचा परमेश्राने शब्द दिला आहे.

2 राजे 15:29

अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर हा इस्राएलवर चाल करुन आला. पेकह इस्राएलचा राजा होता तेव्हा हे घडले. तिग्लथ-पिलेसरने इयोन, आबेल, बेथ माका, यानोह, केदेश, हासोर, गिलाद, गालील आणि सर्व नफताली प्रांत घेतला. तसेच तेथील सर्व लोकांना कैद करुन अश्शूरला नेले.

2 राजे 17:6

होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन हस्तगत केले. इस्राएल लोकांना त्याने कैद करुन अश्शूरला नेले. त्यांना त्याने हलहा येथे तसेच गोजानमधील हाबोर नदीजवळ आणि मेदीलोकांच्या नगरात ठेवले.

1 इतिहास 4:41

हिज्कीया यहूदाचा राजा होता त्यावेळची ही हकीकत. ते लोक गदोरपर्यंत आले आणि हामच्या लोकांशी त्यांनी लढाई केली. हामच्या लोकांच्या राहुट्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या. तेथे राहणाऱ्या मूनी लोकांनाही त्यांनी ठार केले. आजही या भागात मूनीलोक आढळत नाहीत. तेव्हा या लोकांनी तेथे वस्ती केली. मेंढरांसाठी कुरण असल्याने ते तेथे राहिले.

1 इतिहास 5:26

इस्राएलाच्या देवाने अश्शूरचा राजा पूल याच्या मनात लढाईवर जाण्याची इच्छा जागवली. पूल म्हणजेच तिल्गथ -पिल्नेसर. त्याने मनश्शे, रऊबेन आणि गाद घराण्यातील लोकांशी लढाई केली. त्यांना त्याने ते होते तिथून हुसकावून लावले आणि कैदी केले. पूलने मग त्यांना हलह, हाबोर, हारा आणि गोजान नदीजवळ आणले. तेव्हा पासून आजतागायत इस्राएलाच्या त्या घराण्यांतील लोक तेथे राहत आहेत.

1 इतिहास 6:26

एलकानाचा मुलगा सोफय. सोफयचा मुलगा नहथ.

2 इतिहास 26:7

पलिष्टे, गुरबालमधले अरब आणि मऊनी यांच्याशी झालेल्या लढायांमध्ये परमेश्वराने उज्जीयाला साहाय्य केले.

2 इतिहास 32:8

अश्शूरच्या राजाजवळ फक्त मनुष्यबळ आहे. आपल्या बाजूला मात्र साक्षात परमेश्वर देव आहे. तोच आपल्याला मदत करील.” आपल्या युध्दात तोच लढेल अशाप्रकारे हिज्कीयाचे धीराचे बोलणे ऐकून लोकांना त्यावर विश्वास बसला आणि त्यांना हुरुप आला.

रोमकरांस 8:31

यावरुन आपण काय म्हणावे? देव जर आपल्या बाजूचा आहे तर आपल्या विरुद्ध कोण?

Interlinear

Choose Theme