बाशानपासून बाल-हर्मेान, सनीर आणि हर्मेान डोंगर येथपर्यंत मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांनी वस्ती केली. तेथे त्यांची संख्या बरीच वाढली.
Cross references
योसेफची मुले मनश्शे व एफ्राईम. या प्रत्येकापासून कुळे निर्माण झाली.
“अशाच पद्धतीने अमोऱ्यांच्या दोन राजांच्या ताब्यातला प्रदेशही आपण घेतला. तो म्हणजे यार्देनच्या पूर्वेकडचा, आर्णोन खोऱ्यापासून हर्मोन पर्वतापर्यंतचा.
(सीदोनी लोक या हर्मोन पर्वताला सिर्योन म्हणतात. पण अमोरी लोक सनीर म्हणतात.)
योसेफ माजलेल्या बैलासारखा आहे. त्याचे दोन पुत्र बैलाच्या शिंगांप्रमाणे आहेत. ते लोकांवर चढाई करुन त्यांना पृथ्वीच्या सीमेपर्यंत ढकलतील. असे मनश्शेचे हजारो आणि एफ्राइमचे लाखो आहेत.”
तसेच गिलादांचे नगर व गशूरी आणि माकाथी यांचा प्रदेश येथपर्यंत ही जमीन भिडलेली होती. हर्मोन पर्वत, सलकापर्यंतचा सर्व बाशान त्यांच्या हद्दीत होता.
मनश्शाच्या अध्या वंशाला मोशेने दिलेली जमीन अशी;
हर्मोन पर्वतावरुन सियोनवर पडणाऱ्या हळूवार पावसासारखे वाटते.सियोन पर्वतावरच परमेश्वराने त्याचे आशीर्वाद, त्याचे शाश्वत जीवनाचे आशीर्वाद दिले.
लबोनान मधून माझ्या वधू, तू माझ्याबरोबर ये. लबानोनमधून माझ्याबरोबर ये. अमानाच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये, सनीर व हर्मोन यांच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये. सिंहाच्या गुहेतून, चित्यांच्या पर्वतावरुन माझ्याबरोबर ये.