Home Bibles 2 इतिहास 23:13 · मराठी बायबल
2 इतिहास 23:13 · मराठी बायबल

पाहते तो तिला राजा दिसला. प्रवेशद्वाराशी तो राजस्तंभाजवळ उभा होता. कर्णे वाजवणारे कारभारी आणि लोक राजा जवळ उभे होते. देशभरचे लोक कर्णे वाजवून आनंद व्यक्त करत होते. गाणारे वाद्ये वाजवत होते आणि त्यांनी म्हटलेल्या स्तवनगीतापाठोपाठ लोक म्हणत होते. तेव्हा आपली तीव्र नापसंती दाखवण्यासाठी अथल्याने आपले कपडे फाडले आणि “फितुरी, फितुरी” असे ती ओरडली.

Cross references

गणना 10:1

परमेश्वर मोशेला म्हणाला,

शास्ते 7:8

तेव्हा गिदोनने बाकीच्यांना परत पाठवून तीनशे जणांना आपल्या बरोबर राहू दिले. जे परत गेले त्यांची शस्त्रसामुग्री आणि रणवाद्ये तीनशे जणांनी ठेवून घेतली.गिदोनच्या तळाच्या खालच्या खोऱ्यातच मिद्यानी लोकांचा तळ होता.

शास्ते 7:18

तुम्ही शत्रूच्या शिबिराला वेढा घाला. मी आणि माझ्या बरोबरची माणसे रणशिंग फुंकू तेव्हा तुम्हीही तसेच करा नंतर “परमेश्वराचा जय असो, गिदोनचा जय असो’ अशी गर्जना करा.”

1 राजे 1:39

सादोक याजकाने पवित्र मंडपातून तेल आणले. आणि त्या तेलाने सादोकने शलमोनाच्या मस्तकावर अभिषेक केला. त्यांनी कर्णा फुंकला आणि सर्वांनी “शलमोन राजा चिरायू होवो” असा एकच जयजयकार केला.

1 राजे 18:17

अहाबने एलीयाला पाहिले तेव्हा अहाब त्याला म्हणाला, ‘इस्राएलला त्रस्त करुन सोडणारा तूच का तो?”

2 राजे 9:13

हे ऐकून मात्र त्यांनी ताबडतोब आपले अंगरखे उतरवले, येहूच्या समोरच्या पायऱ्यांवर ते ठेवले आणि शिंग फुंकून येहू राजा झाला असल्याची घोषणा केली.

2 राजे 9:23

योरामने ताबडतोब आपले घोडे वळवले आणि पळ काढण्याच्या तयारीत तो अहज्याला म्हणाला, “अहज्या, दगा आहे.”

2 राजे 23:3

स्तंभाजवळ उभे राहून राजाने परमेश्वराशी करार केला. त्याने परमेश्वराची सर्व वचने, करार, नियम पाळायचे कबूल केले. पुस्तकात लिहिलेले सर्व मनोभावे पाळायचे त्याने आश्वासन दिले. राजाने केलेल्या या कराराला पाठिंबा दशर्विण्यासाठी सर्वजण उठून उभे राहिले.

1 इतिहास 12:40

याखेरीज इस्साखार, जबुलून, नफताली अशा आसपासच्या भागात राहणाऱ्यांनी गाढंब, उंट, खेचरं, गुंरं यांच्या पाठीवर लादून अनेक खाद्यपदार्थ आणले. कणीक, अंजीराच्या ढेपा, मनुका, द्राक्षारस, तेल, गुरे - मेंढरे असे बरेच काही आणले. इस्राएलमध्ये आनंदीआनंद पसरला होता.

1 इतिहास 15:16

दावीदाने लेवी प्रमुखांना आपल्या गायकबंधूंना बोलावून घ्यायला सांगितले. सतार, वीणा, झांजा ही वाद्ये आणून त्यांना मंगलगीते म्हणायला सांगितले.

1 इतिहास 15:24

शबन्या, योशाफाट, नथानेल, अमासय, जखऱ्या, बनाया आणि अलियेजर हे याजक करारकोशापुढे चालताना कर्णे वाजवत होते. ओबेद-अदोम आणि यहीया हे करार कोशाचे आणखी दोन रक्षक होते.

1 इतिहास 15:27

करारकोश वाहून नेणाऱ्या सर्व लेवींनी तलम वस्त्राचे अंगरखे घातले होते. गायकप्रमुख कनन्या आणि इतर सर्व गायक यांनी तलम झगे घातले होते. दावीदाचा अंगरखा देखील तलम कापडाचा होता. शिवाय त्याने तशाच कापडाचा एफोद सुध्दा घातला होता.

1 इतिहास 25:1

दावीद आणि सैन्यातील अधिकारी यांनी मिळून आसाफच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमान व यदूथून ही ती मुले. वीणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये, वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरुप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी पुढीलप्रमाणे:

1 इतिहास 25:6

परमेश्वराच्या मंदिरात गीते गाण्यासाठी हेमानने आपल्या सर्व मुलांना हाताशी धरले. ही मुले झांजा, सतारी आणि वीणा वाजवत, आणि देवाची सेवा करत. राजा दावीदाने यांना निवडले होते.

2 इतिहास 34:31

मग राजा उभा राहिला. त्याने परमेश्वराशी करार केला. परमेश्वराला अनुसरायचे, त्याचे आज्ञा, नियम आणि विधी पाळायचे त्याने कबूल केले. हे सर्व त्याने मन:पूर्वक करायचे मान्य केले. नियमशास्त्रातील वचनांप्रमाणे वागायचे कबूल केले.

स्तोत्रसंहिता 14:5

त्या दुष्टांना गरीब माणसाच्या उपदेशाकडे लक्ष द्यायचे नव्हते. का? कारण तो गरीब माणूस देवावर अवलंबून होता. परंतु देव त्याच्या चांगल्या माणसांबरोबर असतो. म्हणून वाईट लोकांना भीती वाटण्याजोगे बरेच काही असते.

नीतिसूत्रे 11:10

चांगली माणसे जेव्हा यशस्वी होतात तेव्हा सर्व शहर आनंदी होते. जेव्हा दुष्टांचा नाश होतो तेव्हा लोक आनंदाने ओरडू लागतात.

नीतिसूत्रे 29:2

राज्यकर्ता जर चांगला असेल तर सगळे लोक आनंदी असतात. पण वाईट माणूस राज्य करत असेल तर सगळेजण तक्रार करतात.

उपदेशक 9:12

पुढच्या क्षणी काय घडणार आहे ते माणसाला कळत नाही. तो जाव्व्यात अडकलेल्या माश्यासारखा असतो. माशालाही काय घडणार आहे ते माहीत नसते. तो सापव्व्यात अडकलेल्या पक्ष्यासारखा असतो. पक्ष्यालाही पुढे काय घडणार आहे ते माहीत नसते. त्याच प्रमाणे माणूसही अचानक घडणाऱ्या वाईट गोष्टीच्या सापव्व्यात अडकतो.

यहेज्केल 46:2

राजा, त्या दाराच्या द्वारमंडपापासून आता जाऊन दाराच्या खांबाशी उभा राहील. मग याजक त्याच्यासाठी होमार्मण व शांत्यर्पण करील. राजा दाराच्या उंबऱ्यात उपासना करील मग तो बाहेर जाईल. पण दार संध्याकाळशिवाय बंद होणार नाही.

रोमकरांस 2:1

म्हणून हे मनुष्या, तू जो कोणी आहेस व जेव्हा तू न्यायासनासमोर बसतोस तेव्हा तुला सबब नाही, कारण जेव्हा तू दुसऱ्यांचा न्याय करतोस तेव्हा तू स्वत:लाही दोषी ठरवितोस कारण जो तू न्याय करतोस, तो तूही तीच गोष्ट करतोस.

Interlinear

Choose Theme