Home Bibles 1 इतिहास 19:19 · मराठी बायबल
1 इतिहास 19:19 · मराठी बायबल

इस्राएलाने आपला पाडाव केला आहे हे हदरेजरच्या अधिकाऱ्यांचा लक्षात आल्यावर त्यांनी दावीदाशी तह केला. ते दावीदाच्या अधिपत्याखाली आले. अराम्यांनी पुन्हा अम्मोनी लोकांना मदत केली नाही.

Cross references

उत्पत्ति 14:4

या सर्व राजांनी बारा वर्षे कदार्ला गोमर राजाची सेवा केली, पंरतु तेरव्या वर्षी ते त्याच्या विरुद्ध उठले.

यहोशवा 9:9

त्या लोकांनी सांगिलते, “आम्ही तुमचे दास आहोत. तुमच्या परमेश्वर देवाच्या सामर्ध्याची कीर्ती ऐकून आम्ही फार दूरवरून आलो आहोत. त्याने ज्या गोष्टी केल्या त्याबद्दल आम्ही ऐकले. मिसरमध्ये त्याने जे जे केले ते आमच्या ऐकण्यांत आले.

2 शमुवेल 10:1

पुढे अम्मोन्यांचा राजा नाहाश मरण पावला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा हानून राज्यावर आला.

2 शमुवेल 10:19

हदरेजरच्या मांडलीक राजांनीही इस्राएलांनी केलेला हा पराभव पाहिला. तेव्हा त्यांनी इस्राएलांशी तह केला व इस्राएलांचे ते चाकर झाले. पुन्हा अम्मोन्यांना मदत करायची अम्मोन्यांनी धास्ती घेतली.

1 राजे 20:1

बेन-हदाद अरामचा राजा होता. त्याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली. त्याच्या बाजूला बतीस राजे होते. त्यांच्याकडे घोडे आणि रथ होते. त्यांनी शोमरोनला वेढा घातला आणि युध्द पुकारले.

1 राजे 20:12

राजा बेन - हदाद इतर राजांच्या बरोबर आपल्या तंबूत मद्यपान करत बसला होता. त्यावेळी हे दूत आले आणि राजाला हा संदेश दिला. त्याबरोबर बेनहदादने आपल्या माणसांना चढाईचा व्यूह रचायला सांगितले. त्याप्रमाणे लोकांनी आपापल्या जागा घेतल्या.

1 इतिहास 14:17

त्यामुळे दावीदाची कीर्ती सर्वदूर पसरली. देवाने सर्व राष्ट्रांत दावीदाची दहशत निर्माण केली.

स्तोत्रसंहिता 18:39

देवा, तू मला युध्दात शक्तिमात बनवलेस तू माझ्या शत्रूंना माझ्यासमोर पडायला लावलेस.

स्तोत्रसंहिता 18:44

ते लोक माझ्या विषयी ऐकतील आणि लगेच माझ्या आज्ञांचे पालन करतील. ते परदेशी मला घाबरतील.

स्तोत्रसंहिता 48:3

इथे त्या शहराच्या राजवाड्यांत देवाला किल्ला म्हणतात.

यशया 10:8

कदाचित् आपण जिंकलेल्या आणि त्याच्या हुकमतीखाली असलेल्या प्रदेशांच्या राजांचा अश्शूर येथे निर्देश करत असेल. अश्शूर स्वत:शीच म्हणतो, ‘माझे सर्व राजपुत्र राजेच नाहीत का?

Interlinear

Choose Theme