हदरेजरच्या मांडलीक राजांनीही इस्राएलांनी केलेला हा पराभव पाहिला. तेव्हा त्यांनी इस्राएलांशी तह केला व इस्राएलांचे ते चाकर झाले. पुन्हा अम्मोन्यांना मदत करायची अम्मोन्यांनी धास्ती घेतली.
Cross references
शिनाराचा राजा अम्रफेल, एल्लासाराचा राजा अर्योक, एलामाचाराजा कदार्लागोमर आणि गोयीमाचा राजा तिदाल,
मग मागे वळून यहोशवाने हासोर घेतले. हासोरच्या राजाला त्याने ठार केले. (इस्राएलविरुध्द लढणाऱ्या सर्व राज्यांचे नेतृत्व हासोरने केले होते.)
तेव्हा तो राजा म्हणाला, “मी आत्तापर्यंत सत्तर राजांच्या हातापयांचे अंगठे कापले आहेत. मी ताटाबाहेर टाकलेले अन्र त्यांना वेचून खावे लागत होते. त्या राजांबरोबर मी ज्या गोष्टी केल्या त्याबद्दल परमेश्वराने मला परतफेड केली आहे.” यहूदाच्या लोकांनी मग त्या बेजेकच्या राजाला यरुशलेम येथे नेले. तेथेच तो मराण पावला.
मग त्याने दिमिष्कातील अरामात आपली ठाणी बसवली. हे अरामी लोकही दावीदाचे अंकित झाले आणि त्यांनी खंडणी आणली. दावीदाला परमेश्वराने तो जाईल तेथे यश दिले.
बेन-हदाद अरामचा राजा होता. त्याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली. त्याच्या बाजूला बतीस राजे होते. त्यांच्याकडे घोडे आणि रथ होते. त्यांनी शोमरोनला वेढा घातला आणि युध्द पुकारले.
इस्राएलाने आपला पाडाव केला आहे हे हदरेजरच्या अधिकाऱ्यांचा लक्षात आल्यावर त्यांनी दावीदाशी तह केला. ते दावीदाच्या अधिपत्याखाली आले. अराम्यांनी पुन्हा अम्मोनी लोकांना मदत केली नाही.
नंतर मी माझ्या शत्रूंचा पाठलाग करु शकतो आणि त्यांना पकडू शकतो त्यांचा नायनाट झाल्याशिवाय मी परत येणार नाही.
एकदा काही राजे भेटले. त्यांनी या शहरावर हल्ला करायची योजना आखली ते सगळे चालून आले.
पण परमेश्वरा, तू त्यांना शिक्षा करण्यास तयार हो. नक्कीच ते हे पाहातील नाही का? परमेश्वरा, तुझ्या लोकांबद्दल असलेले तुझे भक्कम प्रेम तू पाप्यांना दाखव. मग ते नक्कीच खजील होतील. तुझे शत्रू नक्कीच त्यांच्याच आगीत भस्मसात होतील.
राजा तू सर्वांमध्ये मोठा राजा आहेस. स्वर्गातल्या देवाने तुला राज्य, सत्ता, सामर्थ्य व वैभव दिले आहे.
तिच्या शारीरिक पीडांच्या भीतीमुळे ते राजे दूरउभे राहतील, आणि ओरडतील:“भयंकर! भयंकर, हे महान नगरी बाबेल, सामर्थ्याच्या शहरा! एका तासात तुझा न्याय तुझ्यावर येईल!”