इस्राएल लोकांसमोरुन अराम्यांनी पळ काढला. दावीदाने व त्याच्या सैन्याने सात हजार अरामी सारथी आणि चाळीस हजार अरामी सैन्य यांना ठार केले. अरामी सैन्याचा नेता शोफख यालाही त्यांनी मारुन टाकले.
Cross references
पण दावीदाने अराम्यांचा पराभव केला. अराम्यांनी इस्राएल लोकां समोरुन पळ काढला. दावीदाने सातशे रथांवरील माणसे आणि चाळीस हजार घोडेस्वार यांना ठार केले. अरामी सैन्याचा प्रमुख शोबख यालाही दावीदाने ठार केले.
आपल्या लोकांसाठी आणि देवाच्या या नगरांसाठी लढताना आपण प्रयत्नांची शिकस्त करु, शौर्य गाजवू. मग परमेश्वराला जे योग्य वाटेल ते तो करो.”
देव मला शक्ति देतो शुध्द जीवन जगण्यासाठी तो मला मदत करतो.
राजा त्याच्या स्व:तच्या सामर्थ्याने सुरक्षित राहू शकत नाही. शूर सैनिक त्याच्या स्व:तच्या शक्तीमुळे सुरक्षित राहू शकत नाही.
तो सर्वशक्तिमान परमेश्वर आपल्याबरोबर आहे. याकोबाचा देव ही आपली सुरक्षित जागा आहे.