Home Bibles 1 इतिहास 10:9 · मराठी बायबल
1 इतिहास 10:9 · मराठी बायबल

शौलाच्या देहावरील वस्तू त्यांनी घेतल्या. त्याचे मस्तक आणि चिलखत लांबवले. हे वर्तमान आपल्या दैवतांना आणि लोकांना कळवायला त्यांनी देशभर दूत रवाना केले.

Cross references

शास्ते 16:23

पलिष्ट्यांचे अधिकारी मोठा आनंदोत्सव साजरा करायला एकदा एकत्र जमले. आपला देव दागोन याच्या प्रीत्यर्थ ते मोठा यज्ञ करणार होते. कारण त्यांना वाटत होते की शमशोन या शत्रूचा पाडाव करायला त्यांच्या ह्या दैवताने त्यांना मदत केली होती.

1 शमुवेल 31:9

पलिष्ट्यांनी शौलचे मुंडके कापले आणि चिलखत, शस्त्रे पळवली सर्व देशभरच्या लोकांना आणि देवळांमधून त्यांनी हे वर्तमान कळवले.

2 शमुवेल 1:20

ही बातमी गथ मध्ये सांगू नका अष्कलोनच्या रस्त्यांवर जाहीर करु नका. नाहीतर पलिष्ट्यांच्या त्या मुली (शहरे) आनंदित होतील. नाहीतर (सुंता न केलेल्या) त्या परकीयांच्या मुलींना (शहरांना) आनंद होईल.

1 इतिहास 10:4

तेव्हा आपल्या शस्त्रवाहकाला शौल म्हणाला, “तुझी तलवार उपस आणि ती माझ्यावर चालव. नाहीतर हे उपरे येऊन माझी विटंबना करतील.”पण शौलाच्या या शस्त्रवाहकाचा धीर झाला नाही. त्याने शौलाला मारण्यास नकार दिला. तेव्हा शौलाने स्वत:ची तलवार स्वत:ला मारण्यासाठी वापरली. तो स्वत:तलवारीच्या टोकावर पडला.

दानीएल 5:2

राजाने मद्य पिता-पिता आपल्या सेवड्ढांना सोन्या चांदीचे प्याले आणण्याचा हुकूम दिला. हे प्याले, त्याचे आजोबा नबुखद्नेस्सर यांनी यरुशलेमच्या मंदिरातून आणले होते. राजघराण्यातील लोकांनी राजाच्या स्त्रियांनी आणि दासींनी त्या प्याल्यांतून मद्य प्यावे अशी राजाची इच्छा होती.

दानीएल 5:23

नाही! तू नम्र झाला नाहीस उलट तू स्वर्गातल्या देवाच्याविरुध्द गेलास. देवाच्या मंदिरातील प्याले आणण्याचा तू हुकूम दिलास. त्या प्याल्यातून तू, तुझे राजदरबारी, तुझ्या स्त्रिया आणि दासी मद्य प्यालात, आणि सोने-चांदी, कासे, लोखंड, लाकूड वा दगड यांच्यापासून बनविलेल्या देवतांची तू स्तुती केलीस. ते खरे देव नाहीत. ते पाहू शकत नाहीत ऐकू शकत नाहीत. त्यांना काही समजत नाही तू, तुझ्या जीवनावर व तू करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर ज्या देवाचे प्रभुत्व आहे, त्याचा मान राखला नाहीस.

मत्तय 14:11

मग त्यांनी त्याचे शीर तबकात घालून त्या मुलाला आणून दिले. तिने ते आपल्या आईकडे आणले.

Interlinear

Choose Theme