मग त्यांनी त्याचे शीर तबकात घालून त्या मुलाला आणून दिले. तिने ते आपल्या आईकडे आणले.
Cross references
त्यांचा राग शाप आहे; ते अति रागाने वेडे होतात तेव्हा अतिशय क्रूर बनतात; याकोबाच्या जमिनीत त्यांना वाटा मिळणार नाही. ते सर्व इस्राएल देशभर पसरतील.”
राग क्रूर आणि नीच असतो त्यामुळे सर्वनाश होतो. पण मत्सर त्याहीपेक्षा वाईट असतो.
खुनी लोक नेहमी प्रामाणिक माणसांचा तिरस्कार करतात. त्या दुष्टांना प्रामाणिक आणि चांगल्या लोकांनाठार मारायचे असते.
यहोयाकीम, तुला फक्त तुझा फायदाच दिसतो. तू तुझ्यासाठी जास्तीत जास्त मिळविण्याचाच फक्त विचार करतोस. निरापराध्यांना ठार मारण्यात व दुसऱ्याकडून वस्तू चोरण्यातच तुझे मन जडले असते.
‘परमेश्वर, माझा प्रभू, यरुशलेमला पुढील गोष्टी सांगतो, असे तू त्याना सांगितले पाहिजे. तुझ्या इतिहासावर नजर टाक. कनानमध्ये तुझा जन्म झाला. तुझे वडील अमोरी व आई हित्ती होती.
“तुझी आई सिंहीणीसारखी आहे. ती तरुण सिंहांबरोबर झोपते. ती तरुण सिंहाबरोबर झोपली आणि तिला बरीच पिल्ले झाली.
म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “ती शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो की मी तुला मृत्युदंड देईन. मृत्यू तुझा पाठलाग करील. लोकांना ठार करण्यात तुला घृणा वाटली नाही. म्हणून मृत्यू तुझा पाठलाग करील.
लोकांनी तुझ्या पवित्र लोकांचे रक्त सांडले. तुझ्या संदेष्ट्यांचे रक्त सांडले आता तू त्या लोकांना रक्त प्यावयास दिले आहेस.कारण ते याच पात्रतेचे आहेत.”
मी पाहिले ती स्त्री रक्तसेवनाने मस्त झाली होती. ती देवाच्या पवित्र लोकांचे रक्त प्याली होती. ज्या लोकांनी येशूविषयीसांगितले त्याचे रक्त ती प्याली होती.जेव्हा मी तिला पाहिले तेव्हा फार आश्चर्यचकित झालो.