Home Bibles 1 इतिहास 1:28 · मराठी बायबल
1 इतिहास 1:28 · मराठी बायबल

इसहाक आणि इश्माएल ही अब्राहामची मुले.

Cross references

उत्पत्ति 16:11

परमेश्वराचा दूत पुढे आणखी म्हणाला,“तू आता गरोदर आहेस आणि तुला मुलगा होईल त्याचे नांव तू इश्माएल म्हणजे ‘परमेश्वर एकतो’ असे ठेव कारण प्रभूने तुझ्या दु:खविषयी ऐकले आहे; (तो तुझे सहाय्य करील.)

उत्पत्ति 16:15

हागारेला अब्रामापासून मुलगा झाला; अब्रामाने त्याचे नाव इश्माएल ठेवले.

उत्पत्ति 17:19

देव म्हणाला, “नाही, मी सांगितले की तुझी बायको सारा हिला मुलगा होईल; त्याचे नाव तू इसहाक ठेव; मी त्याच्याशी करार करीन; तो करार त्याच्या वंशजांसाठी चिरंनतर असेल.

उत्पत्ति 21:2

सारा गरोदर राहिली आणि अब्राहामाच्या म्हातारपणी तिने त्याला मुलगा दिला. ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वराने वचन दिल्याप्रमाणे अगदी जशाच्या तशाच घडून आल्या.

उत्पत्ति 21:9

ह्याच्या आधी साराची मिसर देशाची दासी हागार हिने अब्राहामापासून एका मुलाला जन्म दिला होता; अब्राहाम त्याचाही बाप होता. परंतु आता साराने पाहिले की तो आधीचा मुलगा इसहाकाला चिडवत होता.

उत्पत्ति 21:12

परंतु देव अब्राहामाला म्हणाला, “त्या मुलाबद्दल बिलकूल चिंता करु नकोस, तसेच त्या दासीचीही चिंता करु नकोस. साराच्या इच्छेप्रमाणे कर. इसहाकच तुझा एकटाच वारस होईल.

उत्पत्ति 25:12

अब्राहामापासून सारेची दासी हागार हिला झालेल्या इश्माएलाची ही वंशावळ;

उत्पत्ति 25:19

इसहाकाची घराणी अशी अब्राहामाला इसहाक नावाचा मुलगा होता.

Interlinear

Choose Theme