Home Bibles उत्पत्ति 25:19 · मराठी बायबल
उत्पत्ति 25:19 · मराठी बायबल

इसहाकाची घराणी अशी अब्राहामाला इसहाक नावाचा मुलगा होता.

Cross references

उत्पत्ति 21:3

अब्राहामापासून साराला मुलगा झाला आणि त्याने त्याचे नाव इसहाक ठेवले.

1 इतिहास 1:28

इसहाक आणि इश्माएल ही अब्राहामची मुले.

1 इतिहास 1:32

कटूरा ही अब्राहामची दासी होती. तिने जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक, शूह यांना जन्म दिला. यक्षानला सबा व ददान हे मुलगे झाले.

1 इतिहास 1:34

इसहाक हा अब्राहामचा मुलगा. एसाव आणि इस्राएल (याकोब) हे इसहाकचे मुलगे.

मत्तय 1:2

अब्राहाम इसहाकचा पिता होता. इसहाक याकोबाचा पिता होता. याकोब याहूदा व त्याच्या भावांचा पिता होता.

लूक 3:34

यहूदा याकोबाचा मुलगा होता. याकोब इसहाकाचा मुलगा होता. इसहाक अब्राहामाचा मुलगा होता. अब्राहाम तेरहाचा मुलगा होता. तेरह नाहोराचा मुलगा होता.

प्रेषितांचीं कृत्यें 7:8

देवाने अब्राहामाशी करार केला, या कराराचे चिन्ह होते सुंता. आणि म्हणून जेव्हा अब्राहामाला मुलगा झाला, तेव्हा अब्राहामाने आपल्या मुलाची, तो आठ दिवसांचा असताना, सुंता केली. त्याच्या मुलाचे नाव इसहाक होते. इसहाकानेसुद्धा आपला मुलगा याकोब याची सुंता केली. व याकोबाने आपल्या मुलांची सुंता केली, हे पुत्र नंतर बारा (पूर्वज) वडील झाले.

Interlinear

Choose Theme