यहोशवा
Chapter 16
मराठी बायबल1योसेफच्या वंशजांच्या वाटचाची जमीन अशी: तिची हद्द यरीहो जवळ यार्देन नदी पासून सुरु होते व यरीहोच्या पूर्वेकडील जलाशयापर्यंत जाते. तेथून ती बेथेलच्या डोंगराळ प्रदेशापर्यंत चढत जाते.
2मग ती बेथेल (लूज) पासून अकर्लोकांची सीमा अटारोथ येथपर्यंत जाते.
3मग ती पश्चिमेला वळून यफलेटी लोकांच्या सीमेजवळून लोअर बेथ-होरोन जवळ व तेथून गेजेर कडून भूमध्य समुद्राशी येऊन ठेपते.
4योसेफची मुले : मनश्शे व एफ्राईम यांच्या वंशजांना मिळालेली जमीन अशी :
5एफ्राईमचा वाटा; अप्पर-बेथ-होरोन जवळच्या अटारोथ अद्दार येथे पूर्वेकडील हद्द सूरु होते.
6मिखथाथ जवळ पश्चिम हद्द सुरु होते. पूर्वेला ती तानथशिलोजवळ वळून तशीच पुढे पूर्वेकडे यानोहा येथपर्यंत जाते.
7यानोहापासून अटारोथ व नारा येथपासून खाली येऊन यरीहोला पोचून यार्देन नदीशी थांबते.
8तप्पूहापासून ही सीमा पश्चमेला काना ओढ्यापर्यंत जाते व समुद्राशी तिचा शेवट होतो. ही एफ्राईमच्या लोकांना दिलेली जमीन सर्व कुळांना त्यात वाटा मिळाला.
9एफ्राईमाची हद्दीलगतची बरीचशी गावे तशी मनश्शेच्या हद्दीतील होती. पण एफ्राईम लोकांना ती मिळाली.
10तथापी, गेजेर मध्ये राहणाऱ्या कनानी लोकांना ते घालवू शकले नाहीत. तेव्हा कनानी लोक अजूनही एफ्राईम लोकांमध्येच राहतात. व ते एफ्राईम लोकांचे दास झाले.
Bible Study with Steffi App
Download Free ↗
Memorize verses with spaced repetition. Free, no ads, 15+ languages.