Home Bibles जखऱ्या 6:10 · मराठी बायबल
जखऱ्या 6:10 · मराठी बायबल

“हेल्दय, तोबीया व यदया हे बाबेलच्या बंद्यांकडून आले आहेत. त्याच्याकडून सोने आणि चांदी घेऊन, सफन्याचा मुलगा, यहोशवाकडे जा.

Cross references

2 राजे 25:18

नबुजरदानने मंदिरातून खालील लोकांना नेले मुख्य याजक सराया दुय्यम याजक सफन्या आणि तीन द्वारपाल

एज्रा 7:14

एज्रा, मी आणि माझे सात मंत्री तुला पाठवत आहोत. तू यहूदा आणि यरुशलेमला जावेस. देवाचे नियमशास्त्र तुझ्याकडे आहेच. त्याचे पालन लोक कसे काय करत आहेत ते तू पाहावेस.

एज्रा 8:26

मी वजन केले त्याप्रमाणे चांदी 25 टन भरली, चांदीची तबके आणि इतर वस्तू 3 3/4 टन भरल्या. सोने 3 3/4 टन होते.

यशया 66:20

आणि ते सर्व राष्ट्रांतून तुमच्या भावा बहिणींना आणतील. ते त्यांना माझ्या पवित्र डोंगरावर, यरूशलेमला, आणतील. तुमची ही भावंडे घोड्यांवरून गाढवांवरून, उंटांवरून, रथांतून आणि गाड्यांतून येतील. तुमची ही भावंडे म्हणजे जणू काही इस्राएलच्या लोकांनी निर्मळ तबकांतून, परमेश्वराच्या मंदिरात आणलेले नजराणे असतील.

यिर्मया 28:6

यिर्मया हनन्याला म्हणाला, ‘तथास्तु! (आमेन) परमेश्वर खरोखरच असे करो! परमेश्वर तुझा संदेश खरा करील, अशी मी आशा करतो. परमेश्वर खरोखरच त्याच्या मंदिरातील बाबेलला नेलेल्या वस्तू परत येथे आणो आणि बळजबरीने घरे सोडण्यास भाग पाडलेल्या लोकांना परमेश्वर येथे परत आणो!

प्रेषितांचीं कृत्यें 24:17

“अनेक वर्षे दूर राहिल्यानंतर माइया लोकांतील गरीबांना दान देऊन यरुशलेममध्ये स्वत:साठी अर्पण करावे म्हणून मी मंदिरात जाऊन हा विधी करीत असताना, शुद्धीकरण झालेला असा मी त्यांस आढळलो.

रोमकरांस 15:25

पण मी यरुशलेमातील संतांच्या सेवेसाठी जात आहे.

Interlinear

Choose Theme