Home Bibles जखऱ्या 14:13 · मराठी बायबल
जखऱ्या 14:13 · मराठी बायबल

हा भयंकर रोग शत्रू - सैन्याच्या छावणीत पसरेल. त्यांच्या घोड्यांना, खेचरांना, उंटाना आणि गाढवांनाही हा भयंकर रोग होईल. तेव्हा लोकांना खरोखरच परमेश्वरच परमेश्वराची भीती वाटेल प्रत्येकजण आपल्या शेजाऱ्याचा हात धरील आणि शेजारी एकमेकांशी भांडतील.यहूदाचे लोक यरुशलेममध्ये लढतील. पण नगरीभोवतीच्या सर्व राष्ट्रांकडून त्यांना संपत्ती मिळेल त्यांना भरपूर सोने, चांदी आणि कपडालता मिळेल.

Cross references

शास्ते 7:22

ही तीनशे माणसे रणवाद्ये वाजवत असताना, परमेश्वराने मिद्यानी लोकांना एकमेकांना तलवारीने ठार मारायला लावले. त्यांनी पळ काढला.सरेरा कडे बेथ-शिट्टा आणि टब्बाथ जवळच्या आबेल महोल नगराच्या सीमेपर्यंत हे शत्रूसैन्य पळून गेले.

1 शमुवेल 14:15

तेव्हा छावणीत, शेतात, किल्ल्यावर पसरलेल्या सर्व पलिष्ट्यांमध्ये घबराट पसरली. चांगल्या शूर सैनिकांनीही धास्ती घेतली. त्यांच्या पायाखालची भूमी कंपायमान झाली आणि पलिष्टी भयभीत झाले.

2 इतिहास 20:22

लोकांनी देवाची स्तुतिगीते म्हणण्यास सुरुवात केल्याबरोबर परमेश्वराने चाल करुन आलेल्या अम्मोनी, मवाबी आणि सेइर पर्वतांतील लोकांशी गनिमी काव्याने लढणारी फौज मोक्याच्या जागी बसवली.

यहेज्केल 38:21

परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “इस्राएलच्या पर्वतावर, गोरविरुद्ध मी सर्व प्रकारचे भय आणीन.त्याचे सैनिक भीतीने एवढे गर्भगळीत होतील की ते एकमेकांवरच तलवारीने हल्ले करुन एकमेकांना मारतील.

जखऱ्या 11:6

मला या देशात राहणाऱ्या लोकांबद्दल दु:ख होत नाही.” परमेश्वर असे म्हणाला, “पाहा! मी प्रत्येकाचा शेजाऱ्याकडून व राजाकडून छळ मांडीन आणि अशारीतीने त्यांच्या देशाचा नाश करवीन - मी त्यांना अडविणार नाही.”

जखऱ्या 12:4

पण, त्यावेळी, मी घोड्याला विथरवीन. त्यामुळे घोडेस्वाराचा गोंधळ उडेल. मी शत्रूच्या घोड्यांना अंधळे करीन. माझे डोळे मात्र उघडे असतील. आणि माझी नजर यहूद्यांच्या लोकांवर असेल.

प्रकटीकरण 17:12

“जी दहा शिंगे तू पाहिलीस ते ज्यांना अजून सत्ताधिकार मिळाला नाही, असे दहा राजे आहेत. पण त्यांना श्र्वादाबरोबरएका घटकेसाठी राजासारखा अधिकार मिळेल.

Interlinear

Choose Theme