“जी दहा शिंगे तू पाहिलीस ते ज्यांना अजून सत्ताधिकार मिळाला नाही, असे दहा राजे आहेत. पण त्यांना श्र्वादाबरोबरएका घटकेसाठी राजासारखा अधिकार मिळेल.
Cross references
मग चौथे राज्य येईल ते लोखंडाप्रमाणे मजबुत असेल. ज्याप्रमाणे लोखंड वस्तूचे तुकडे करते, चुरा करते, त्याप्रमाणे ते इतर सर्व राज्यांचा चक्काचूर करील.
पुतव्व्याच्या पावलांचा काही भाग लोखंडाचा व काही मातीचा बनलेला होता, असे तुला दिसले. ह्याचा अर्थ चौथ्या राज्यात भाग असतील. तू लोखंड मातीत मिसळलेले पाहिलेस. म्हणजेच त्या राज्याला थोडे लोखंडासारखे बळ असेल.
“त्यानंतर, मला दृष्टान्तात चौथा प्राणी दिसला. तो फारच नीच व भयंकर दिसत होता. तो फारच बलवान होता. त्याला लोखंडाचे मोठे दात होते, तो त्याच्या बळींना चिरडून खात होता आणि बळींचे उरलेले अवशेष तुडवीत होता. हा चौथा प्राणी मी पाहिलेल्या सर्व प्राण्यांपेक्षा भिन्न होता. त्याला दहा शिंगे होती.
त्याच्या डोक्यावरील दहा शिंगाबद्दलही मला जाणून घ्यायचे होते. उगवलेल्या लहान शिंगाबद्दलही मला उत्सुकता होती. त्या लहान शिंगाने इतर दहा शिंगातील तीन उपटून टाकली. ते इतर शिंगातील तीन उपटून टाकली. ते इतर शिंगाच्या मानाने क्षुद, होते त्याला डोळे होते, तोंड होते, आणि ते तोंड सतत बढाया मारीत होते.
ती दहा शिंगे म्हणजे ह्या चौथ्या राज्याचे दहा राजे आहेत. ह्या दहा राजानंतर आणखी एक राजा येईल त्याच्या आधीच्या राज्य करणाऱ्या राज्यांपेक्षा हा भिन्न असेल. तो तीन राजांचा पराभव करील.
मग मी वर बघितले असता मला चार शिंगे दिसली.
मग दुसरे एक चिन्ह आकाशात दिसले: तेथे फार मोठा तांबडा साप होता. त्या सापाला सात डोकीहोती व त्या सातही डोक्यांवर एक एक मुगूट होता. त्या सापाला दहा शिंगे सुद्धा होती.
मग मी एक श्र्वापद समुद्रातून वर येताना पाहिले. त्याला दहा शिंगे आणि सात डोकी होती. त्याच्या शिंगांवर दहा मुकुटहोते आणि प्रत्येक डोक्यावर देवनिंदाव्यंजक नाव लिहिले होते.
तो श्र्वापद आणि दहा शिंगे तू पाहिलीस ते त्या वेश्येचा तिरस्कारकरतील. ते तिला ओसाड, उजाड करतील आणि तिला नग्न सोडून देतील, ते तिचे मांस खातील, व अग्नीने तिलाजाळतील.
तिच्या शारीरिक पीडांच्या भीतीमुळे ते राजे दूरउभे राहतील, आणि ओरडतील:“भयंकर! भयंकर, हे महान नगरी बाबेल, सामर्थ्याच्या शहरा! एका तासात तुझा न्याय तुझ्यावर येईल!”
एका तासात अशा प्रकारची प्रचंड संपत्ति नष्ट झाली!”प्रत्येक तांडेल, जलप्रवासी तसेच खलाशी आणि समुद्रावर पोट भरणारे सर्व लोक त्या नगरीपासून दूर राहतील.
मग ते आपल्या डोक्यात धूळ घालतील आणि शोक करतील.“भयंकर! भयंकर! हे महान नगरी, ज्या सर्वांकडे समुद्रात जहाजे आहेत ते तिच्या संपत्तीमुळे श्रीमंत झाले एका तासात तिचासर्वनाश झाला.