ते देवाला ओळखत असल्याचा दावा करतात, पण ते त्यांच्या कृत्यांनी देवाला ओळखल्याचे नाकारतात. ते अमंगळ व आज्ञा मोडणारे, व कोणतेच चांगले कृत्य करण्यास लायक नसलेले असे त्यांचे त्यांनीच दाखवून दिले आहे.
Cross references
मी हा निरोप देवाकडून ऐकला. परात्पर देवाने मला जे शिकविले ते मी शिकलो. सर्वशक्तिमान देवाने मला जे दाखविले ते मी पाहिले. मला जे स्पष्ट दिसते ते मी नतमस्तक होऊन सांगतो.
पण शमुवेल म्हणाला, “परमेश्वर जास्त प्रसन्न कशामुळे होईल? यज्ञ आणि होमार्पणे देऊन की त्याच्या आज्ञा पाळल्याने? त्याच्यासाठी यज्ञ करण्यापेक्षा परमेश्वराची आज्ञा पाळणे केव्हाही श्रेयस्कर. मेंढराची चरबी त्याला वाहण्यापेक्षा त्याचे ऐकणे चांगले.
तेव्हा शौल शमुवेलला म्हणाला, “माझ्या हातून पाप झाले आहे. मी परमेश्वराचे वचन पाळले नाही. तुम्ही सांगितले तसे वागलो नाही. लोकांचा मला धाक वाटला आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी वागलो.
मनुष्याप्राणी सर्वांत वाईट आहे, तो अशुध्द आणि कुजलेला आहे. तो वाईट गोष्टी पाण्यासारख्या पितो.
माझा प्रभू म्हणतो, “हे लोक, माझ्यावर त्यांचे प्रेम आहे, असे म्हणतात ते शब्दांनी माझ्याबद्दलचा आदर व्यक्त करतात. पण त्यांची मने माझ्यापासून फार दूर आहेत. त्यांचा माझ्याबद्दलचा आदर, म्हणजे फक्त त्यांनी पाठ केलेले व माणसांनी घालून दिलेले नियम आहेत.
परमेश्वर म्हणतो, “याकोबाच्या वंशजांनो, माझे ऐका. तुम्ही, जे ‘इस्राएलच्या’ नावाने ओळखले जाता. तुम्ही यहुदाच्या वंशातील आहात. तुम्ही वचने देताना परमेश्वराचे नाव घेता. तुम्ही इस्राएलच्या देवाची स्तुती करता. पण हे तुम्ही सच्चे पणाने आणि खरेपणाने करीत नाही.”
म्हणजे माझी उपासना करायला ते रोज येतील. माझे मार्ग जाणून घ्यायची लोकांना इच्छा होईल. योग्यरीतीने जगणारे ते राष्ट्र होईल. देवाच्या चांगल्या आज्ञांचे पालन करण्याचे ते सोडणार नाहीत. त्यांना योग्य न्याय देण्यास ते मला सांगतील. न्याय निर्णयासाठी त्यांना देवाकडे जावेसे वाटेल.
माझ्या लोकांना, ‘टोकाऊ चांदी’ असे म्हटले जाईल. देवाने त्यांचा स्वीकार केला नाही म्हणून त्यांना हे नाव दिले जाईल.”
म्हणून ते माझे लोक असल्यासारखे तुझ्याकडे येतात. ते माझे लोक असल्याप्रमाणे ते करणार नाहीत. ते त्यांना भावते तेच करु इच्छितात. ते लोकांना फसवून खूप पैसा मिळवू बघतात.
‘परमेश्वर, आम्ही इस्राएलमधील लोक तुला ओळखतो’ असे ते किंचाळून मला म्हणतात.
आणि जेव्हापासून त्यांनी देवाला ओळखण्याचे नाकारले, तेव्हापासून देवाने त्यांना अशुद्ध मनाच्या हवाली केले व ज्या अयोग्य गोष्टी त्यांनी करु नयेत त्या करण्यास मोकळीक दिली.
त्या तुम्हांला त्याची इच्छा कळते आणि ज्या सर्वोत्तम गोष्टी आहेत, त्या तुम्ही स्वीकारता कारण नियमशास्त्राद्वारे तुम्हांला शिक्षण मिळाले आहे.
पोकळ भाषणाने कोणी तुम्हांला फसवू नये. कारण या कारणांमुळे जे आज्ञा मोडतात, त्यांच्यावर देवाचा क्रोध येणार आहे.
म्हणजे हे जाणून घेऊन की, नियमशास्त्र हे नीतिमान लोकांसाठी केलेले नाही तर नियमशास्त्राचा भंग करणाऱ्या आणि बंडखोर लोकांसाठी, तिरस्तकरणीय लोकांसाठी, पापयांसाठी, भक्तिहीन आणि अधर्मी लोकांसाठी, वडिलांना ठार मारणाऱ्या, आईला ठार मारणाऱ्यासाठी,
पण जर कोणी त्याच्या स्वत:च्या नातेवाईकासाठी आणि विशेषत: त्याच्या कुटुंबातील जवळच्यांसाठी तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारलेला आहे. व तो अविश्वासू माणसांपेक्षा वाईट आहे.
ते देवाच्या सेवेचे बाहेरचे स्वरूप चांगले राखतील, परंतु त्याचे सामर्थ्य नाकारतील. त्यांच्यापासून नेहमी दूर राहा.
जो असे म्हणतो की, “मी देवाला ओळखतो!” आणि त्याच्या आज्ञा पाळत नाही तर तो लबाड आहे;आणि त्याच्यामध्ये सत्य नाही.
याचे कारण ज्यांच्याविषयी पवित्र शास्त्रात फार पूर्वीच लिहिले आहे की अशी माणसे तुमच्यात चोरुन शिरली आहेत, तेअधार्मिक लोक आहेत. अनीतीने वागण्यासाठी देवाची दया हे निमित आहे असे ते मानतात. आणि आमचा प्रभु व एकमेवधनी अशा प्रभु येशू ख्रिस्ताला ते मानत नाहीत. जी शिक्षेसाठी यापूर्वीच नेमलेली होती, अशी ही माणसे आहेत.
परंतु भित्रे, विस्वास न ठेवणारे अंमगळ, खुनी, व्यभिचारी, (म्हणजे लैंगिक अनीतीनेवागणारे लोक), चेटकी, मूर्तिपूजा करणारे आणि सर्व खोटे बोलणारे अशा सर्वांना अग्नीने व गंधकाने धगधगणाऱ्यातळ्यामध्ये जागा मिळेल. हे दुसरे मरण आहे.”
जे अशुद्ध आहे, ते त्या नगरात प्रवेश करु शकणार नाही.अथवा लाजिरवाणे काम अगर लबाडी करणाऱ्याचा शिरकाव त्या नगरात होणार नाही. कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात ज्यालोकांची नावे नोंदविली आहेत, केवळ तेच लोक त्या नगरात जाऊ शकतील.