जो असे म्हणतो की, “मी देवाला ओळखतो!” आणि त्याच्या आज्ञा पाळत नाही तर तो लबाड आहे;आणि त्याच्यामध्ये सत्य नाही.
Cross references
‘परमेश्वर, आम्ही इस्राएलमधील लोक तुला ओळखतो’ असे ते किंचाळून मला म्हणतात.
ते देवाला ओळखत असल्याचा दावा करतात, पण ते त्यांच्या कृत्यांनी देवाला ओळखल्याचे नाकारतात. ते अमंगळ व आज्ञा मोडणारे, व कोणतेच चांगले कृत्य करण्यास लायक नसलेले असे त्यांचे त्यांनीच दाखवून दिले आहे.
माझ्या बंधूंनो, जर एखादा म्हणतो की, मी विश्वास धरतो पण तशी कृती करीत नाही तर त्याचा काय उपयोग? तो विश्वास त्याला तारू शकणार नाही. शकेल का?
जर आम्ही म्हणतो की, आमची देवाबरोबर सहभागिता आहे पण पापाच्या अंधारामध्ये आम्ही राहतो तर आम्ही खोटेबोलत आहोत व आम्ही सत्याला अनुसरत नाही.
जर आम्ही असे म्हणतो की, आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वत:ला फसवीत आहोत. आणिआमच्यामध्ये सत्य नाही.
जर आम्ही म्हणतो की आम्ही पापकेले नाही तर आम्ही देवाला लबाड ठरवितो. आणि त्याचा संदेश आमच्या अंत:करणात नाही.
जो असे म्हणतो की तो प्रकाशात आहे आणि तरीही आपल्या भावाचा द्वेष करतो तो अजूनसुद्धा अंधारात आहे.
जर एखादा म्हणतो, “मी देवावर प्रीति करतो,”पण त्याच्या भावाचा द्वेष करतो, तर तो खोटे बोलतो. मी हे म्हणतो कारण ज्याला त्याने पाहिलेले आहे अशा भावावर जरएखादा प्रीति करीत नाही. तर ज्या देवाला त्याने पाहिले नाही त्याच्यावर तो प्रीति करु शकत नाही!