कारण माझी खात्री आहे की, मरण किंवा जीवन, देवदूत, अधिकारी आत्मे हल्लीच्या किंवा भविष्यकाळात,
Cross references
मी माझ्या मेंढरांना अनंतकाळचे जीवन देतो. ती कधीच मरणार नाहीत. आणि त्यांना कोणीच माझ्या हातून हिरावून घेणार नाही.
त्याची पूर्ण खात्री होती की, देवाने जे अभिवचन दिले ते पूर्ण करण्यास तो समर्थ आहे.
म्हणून जर आपण जगतो किंवा मरतो तर आपण प्रभूचे आहोत.
तर तो पौल, अपुल्लोस, पेत्र, जग, जीवन किंवा मरण असो, वर्तमानकाळाच्या गोष्टी असोत अथवा भविष्यकाळाच्या गोष्टी असोत, सर्व गोष्टी तुमच्या आहेत.
जेव्हा हे विनाशी शरीर अविनाशीपण धारण करील व हे मर्त्य शरीर अमरत्व धारण करील, तेव्हा पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे होईल.“विजयात मरण गिळले गेले आहे.”यशया 25:8
असे लिहिले आहे: “मी विश्वास ठेवला; म्हणून मी बोललो आहे.” विश्वासच्या त्याच आत्म्याने आम्हीसुद्धा विश्वास ठेवतो आणि म्हणून बोलतो.
कारण या घरामध्ये आम्ही असताना आम्ही कण्हतो, आणि ओइयाने दबले जातो. कारण वस्त्रहीन असण्याची आमची इच्छा नसते, पण आमची इच्छा आहे की, आमच्या स्वर्गीय निवासस्थानाने पोशाख करावा. यासाठी की जे मर्त्य आहेत ते जीवनाने गिळावे.
आणि यात आश्चर्य नाही, कारण सैतानदेखील प्रकाशाच्या दूताचे रुप धारण करतो.
देवाने ख्रिस्ताला प्रत्येक अधिपती, अधिकारी, सामर्थ्य, प्रभूत्व आणि प्रत्येक सामर्थ्याचे नाव जे या युगातच नव्हे तर येणाऱ्या युगातही दिले जाईल त्या सर्वांपेक्षा उंच ठिकाणी ठेवले.
देवाने दिलेले संपूर्ण चिलखत धारण करा. यासाठी की तुम्हांला सैतानाच्या दुष्ट योजनांविरुद्ध उभे राहता यावे.
हे माझ्या उत्सुक अपेक्षेप्रमाणे व आशेप्रमाणे आहे, कारण मला खात्री आहे, की, माझी निराशा होणार नाही, पण आता नेहमीसारखे माझ्या सर्व धैर्याने माझ्या जगण्याने किंवा मरण्याने ख्रिस्ताचा माझ्या शरीराद्वारे महिमा होईल.
कारण स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व काही त्याच्या सामर्थ्याने निर्माण केले गेले. जे काही दृश्य आहे आणि जे काही अदृश्य आहे, सिंहासने असोत किंवा सामर्थ्य असो, सत्ताधीश असोत किंवा अधिपती असोत सर्व काही त्याच्याद्वारे निर्माण केले गेले.
त्याने स्वत: वधस्तंभाद्वारे सत्ता आणि अधिकार हाणून पाडून त्यांवर विजय मिळविला आहे.
आणि या कारणांमुळे मीसुद्धा दु:ख भोगीत आहे. परंतु मी लाजत नाही कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्याला मी जाणतो आणि माझी खात्री पटली आहे की, तो दिवस येईपर्यंत त्याने जे माझ्याकडे सोपविले आहे त्याचे तो रक्षण करील.
हे सर्व लोक विश्वासात मरण पावले. देण्यात आलेल्या वचनांचे प्रतिफळ त्यांना प्राप्त झाले नव्हते. परंतु त्यांनी विश्वासाने ते दुरूनच पाहिले व त्याचे स्वागत केले आणि त्यांनी उघडपणे कबूल केले की ते परके आणि प्रवासी आहेत.
तो स्वर्गात गेलेला आहे आणि देवाच्या उजव्या हाताशी बसला आहे. देवदूत, अधिकार आणि सामर्थ्य हे सर्व त्याच्या अधीन आहेत.
सावध आणि जागरुक असा. तुमचा वैरी जो सैतान तो गर्जना करीत फिरणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून सगळीकडे फिरत असतो.