Home Bibles रोमकरांस 7:24 · मराठी बायबल
रोमकरांस 7:24 · मराठी बायबल

मी अत्यंत दु:खी मनुष्य आहे! मरणाधीन असलेल्या शरीरापासून मला कोण सोडवील?

Cross references

अनुवाद 22:26

त्या मुलीला काही करु नये. देहान्तशासन व्हावे असे तिने काही एक केले नाही. कोणी आपल्या शेजाऱ्यावर चालून जाऊन त्याचा जीव घ्यावा तसेच हे झाले.

1 राजे 8:38

असे कधी झाल्यास, एकाने जरी आपल्या पापाची कबुली दिली व मंदिराकडे हात पसरुन क्षमा याचना केली.

स्तोत्रसंहिता 6:6

परमेश्वरा, सबंध रात्र मी तुझी प्रार्थना केली. माझ्या अश्रुंमुळे माझे अंथरुण ओले झाले आहे. माझ्या अंथरुणातून अश्रू ठिबकत आहेत. तुझ्याजवळ अश्रू ढाळल्यामुळे मी आता शाक्तिहीन, दुबळा झालो आहे.

स्तोत्रसंहिता 32:3

देवा, मी पुन्हा पुन्हा तुझी प्रार्थना केली परंतु माझ्या गुप्त अपराधांची वाच्यता केली नाही प्रत्येक प्रार्थनेच्या वेळी मी क्षीण होत गेलो.

स्तोत्रसंहिता 38:2

परमेश्वरा, तू मला इजा केलीस तुझे बाण माझ्या शरीरात खोलवर रुतले आहेत.

स्तोत्रसंहिता 38:8

मी फार अशक्त झालो आहे मी वेदनांमुळे कण्हत आहे आणि ओरडत आहे.

स्तोत्रसंहिता 71:11

माझे शत्रू म्हणाले, “जा त्याला पकडा देवाने त्याला सोडले आहे आणि कोणीही माणूस त्याला मदत करणार नाही.”

स्तोत्रसंहिता 72:12

आमचा राजा असहाय्याला मदत करतो. आमचा राजा गरीब आणि असहाय्य लोकांना मदत करतो.

स्तोत्रसंहिता 77:3

मी देवाचा विचार करतो आणि मला काय वाटते ते त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो, पण मला ते शक्य नाही.

स्तोत्रसंहिता 88:5

मला तू मृत माणसात शोध. मी थडग्यात असलेल्या प्रेतासारखा आहे. ज्याला तू विसरलास असा एक मृतात्मा, तुझ्यापासून आणि तुझ्या निगराणीपासून दूर गेलेला असा एक.

स्तोत्रसंहिता 91:14

परमेश्वर म्हणतो, “जर एखादा माणूस माझ्यावर विश्वास ठेवेल, तर मी त्याचे तारण करीन. जे माझे अनुयायी माझी उपासना करतात त्यांचे मी रक्षण करतो.

स्तोत्रसंहिता 102:20

आणि तो कैद्यांची प्रार्थना ऐकेल. ज्यांना मृत्युदंड झाला आहे त्यांना तो सोडवेल.

स्तोत्रसंहिता 119:20

तू घेतलेल्या निर्णयांचा मला सतत अभ्यास करावासा वाटतो.

स्तोत्रसंहिता 119:81

परमेश्वरा, तू माझा उध्दार करशील म्हणून वाट बघता बघता मी आता मरुन जाणार आहे. पण परमेश्वरा, तू जे सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे.

स्तोत्रसंहिता 119:131

परमेश्वरा, मला खरोखरच तुझ्या आज्ञांचा अभ्यास करायचा आहे. मी जोर जोरात श्वासोच्छवास करणाऱ्या आणि अधीरतेने वाट बघणाऱ्या माणसासाखा आहे.

स्तोत्रसंहिता 119:143

माझ्यावर खूप संकटे आली आणि वाईट वेळाही आल्या परंतु मला तुझ्या आज्ञा आवडतात.

स्तोत्रसंहिता 119:176

मी हरवलेल्या मेंढीप्रमाणे रस्ता चुकलो. परमेश्वरा, मला शोधाला ये. मी तुझा सेवक आहे आणि मी तुझ्या आज्ञा विसरलो नाही.

स्तोत्रसंहिता 130:1

परमेश्वरा, मी खूप मोठ्या संकटात आहे म्हणून मी तुला मदतीसाठी हाक मारीत आहे.

यहेज्केल 9:4

मग परमेश्वर (म्हणजेच प्रभा) त्याला म्हणाला, “यरुशलेम नगरीत फीर आणि लोक करीत असलेल्या दुष्कृत्यांबद्दल दु:खी आणि अस्वस्थ असलेल्या प्रत्येकाच्या कपाळावर खूण कर.”

मीखा 7:19

तो परत येईल व आमचे सांत्वन करील. तो आमच्या पापांचा चुराडा करील आणि आमची पापे खोल समुद्रात फेकून देईल.

जखऱ्या 9:11

यरुशलेम, तुझ्या करारारवर शिक्कामोर्तब करण्यासाठी आम्ही रक्त वापरले. म्हणून मी जमिनीतील खळग्यात बंदिस्त असलेल्या तुझ्या लोकांना मुक्त करतो.

मत्तय 5:4

जे शोक करतात ते धन्य, कारण त्याचे सांत्वन करण्यात येईल.

मत्तय 5:6

ज्यांना नीतीने वागण्याची तहान व भूक लागली आहे ते धन्य, कारण ते तृप्त होतील.

लूक 4:18

“प्रभूचा आत्मा मजवर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे, यासाठी की, गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी बंदीवान म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आंधळ्यांना दृष्टि मिळावी व त्यांनी बघावे यासाठी, जुलूूम होणाऱ्यांची सुटका करण्यासाठी

रोमकरांस 6:6

आपणांला हे माहीत आहे की, आपल्यातील जुना मनुष्य ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळला गेला यासाठी की आपल्या पापमय शरीराचा नाश व्हावा व यापुढे आपण पापाचे दास होऊ नये.

रोमकरांस 8:2

कारण आत्म्याचा जो नियम ख्रिस्त येशूमध्ये जीवन देतो त्याने पापाचा नियम जो तुम्हांला मरणाकडे नेतो त्यापासून मुक्त केले आहे.

रोमकरांस 8:13

कारण जर तुम्ही तुमच्या पापी देहस्वभावाप्रमाणे जीवन जगाल तर तुम्ही मरणार आहात, परंतु आत्म्याच्या करवी जर तुम्ही देहाची कर्मे ठार माराल तर तुम्ही जगाल.

रोमकरांस 8:26

जेव्हा आपण कण्हतो तेव्हा आत्माही आपल्या अशक्तपणात आपणांस मदत करतो. कारण कशासाठी आपण प्रार्थना करावी, हे आपणांस माहीतसुद्धा नसते. परंतु आत्मा स्वत: आपणांसाठी शब्दांनी जे व्यक्त करता येत नाही, अशा कण्हण्याने मध्यस्थी करतो.

2 करिंथकरांस 1:8

बंधूंनो, आशिया प्रांतात जो त्रास आम्ही सहन केला त्याविषयी तुम्ही अंधारात असावे अशी आमची इच्छा नाही. आम्हांला तेथे मोठे ओझे होते. आमच्या शक्तिपलीकडचे ते ओझे होते. आम्ही जीवनाविषयीची आशासुद्धा सोडून दिली होती.

2 करिंथकरांस 12:7

आणि माझ्या प्रकटीकरणाच्या अतिशय मोठेपणामुळे मी खूप जास्त चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात रुतणारा काटा, (सैतानाचा दूत) मला ठोसे मारण्यासाठी ठेवण्यात आला.

कलस्सैकरांस 2:11

मानवी हातांनी न केलेल्या सुंतेने तुम्हीसुद्धा त्याच्यामध्ये सुंता झालेले आहात. ख्रिस्ताने केलेल्या सुंतेद्वारे तुम्ही तुमच्या पापाच्या सामर्थ्यापासून मुक्त झाला होता,

2 तीमथ्थाला 4:18

प्रभु माल सर्व दुष्कृत्यांपासून सोडवील व त्याच्या स्वर्गाच्या राज्यात सुखरूपपणे आणिल. त्याला सदासर्वकाळपर्यंत गौरव असो.

तीताला 2:14

त्याने स्वत:ला आमच्यासाठी दिले यासाठी की सर्व दुष्टतेपासून त्याने खंडणी भरून आम्हांस सोडवावे व चांगली कृत्ये करण्यासाठी आवेशी असलेले असे जे केवळ आपले लोक त्यांना स्वत:साठी शुद्ध करावे.

इब्री लोकांस 2:15

आणि जे लोक त्यांच्या सर्व आयुष्यात मरणाचे भय मनात ठेवून त्याचे गुलाम असल्यासारखे जगत होते त्यांना मुक्त करावे.

प्रकटीकरण 21:4

तो त्यांच्या डोळ्यांतील अश्रु पूसून टाकील. आणि येथून पुढे मरण असणार नाही. शोक करणे, रडणे आणि अथवादु:खसहन् करणे राहणार नाही. कारण सर्व जुन्या गोष्टी नाहीशा झालेल्या आहेत.”

Interlinear

Choose Theme