Home Bibles स्तोत्रसंहिता 38:8 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 38:8 · मराठी बायबल

मी फार अशक्त झालो आहे मी वेदनांमुळे कण्हत आहे आणि ओरडत आहे.

Cross references

ईयोब 3:24

जेव्हा खायची प्यायची वेळ होते तेव्हा मी दु:खाचा नि:श्वास टाकतो सुखाचा नाही! माझ्या तक्रारी, माझे गाऱ्हाणे पाण्यासारखे बाहेर ओतले जाते.

ईयोब 30:27

मी आतून अगदी मोडून गेलो आहे. माझ्या वेदना कधीच थांबत नाहीत आणि वेदना आणखी येणारच आहेत.

ईयोब 30:28

मी सदैव दु:खी असतो, पण मला स्वास्थ्य लाभत नाही. मी लोकांच्यात उभा राहून मदतीसाठी ओरडतो.

स्तोत्रसंहिता 22:1

माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास? तू इतका दूर आहेस की मला मदत करु शकणार नाहीस. तू इतका दूर आहेस की मी मदतीसाठी मारलेल्या हाका तुला ऐकू येणार नाहीत.

स्तोत्रसंहिता 32:3

देवा, मी पुन्हा पुन्हा तुझी प्रार्थना केली परंतु माझ्या गुप्त अपराधांची वाच्यता केली नाही प्रत्येक प्रार्थनेच्या वेळी मी क्षीण होत गेलो.

यशया 59:11

आम्ही सर्व, फार दु:खी आहोत. आम्ही दु:खाने पारवे व अस्वले यांच्याप्रमाणे कण्हतो. लोक प्रामाणिक होण्याची आम्ही वाचविले जाण्याची वाट पाहत आहोत. पण अजून तरी कोठे प्रामाणिकपणा नाही. आम्ही वाचविले जाण्याची वाट पहात आहोत. पण तारण अजून खूप दूर आहे.

Interlinear

Choose Theme