आणि पुन्हा शाश्त्र असे म्हणते,“विदेशी लोकांनो, देवाच्या निवडलेल्या लोकांबरोबर आनंद करा.” अनुवाद 32:43
Cross references
“समस्त राष्ट्रांनो, देवाचा प्रजेचा जयजयकार करा. कारण हा देव आपल्या सेवकांच्या बाजूने उभा राहतो. आपल्या सेवकांचा संहार करु पाहणाऱ्यांना शासन करतो. शत्रूला योग्य अशी सजा देतो. आणि आपली प्रजा आणि प्रदेश निर्मळ करतो.”
पृथ्वीवरील सारे काही आनंदाने देवाचा जय जयकार करीत आहे.
देवा, लोक तुझी स्तुती करु देत, सर्व लोक तुझी स्तुती करु देत.
पृथ्वीवरच्या राजांनो, देवासाठी गाणे म्हणा, त्याच्यासाठी स्तुतिगीत गा.
परमेश्वर राज्य करतो आणि पृथ्वी आनंदित होते. दूरदूरचे प्रदेश आनंदित होतात.
परमेश्वराने राष्ट्रांना त्याची उध्दाराची शक्ती दाखवली. परमेश्वराने त्यांना त्याचा चांगुलपणा दाखवला.
परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझे बोलणे ऐकतील तेव्हा ते तुझी स्तुती करतील.
वाचलेले लोक आरडाओरड सुरू करतील. त्यांचा आवाज महासागराच्या गर्जनेपेक्षा मोठा असेल. परमेश्वराची महानता पाहून ते आनंदित होतील.
परमेश्वरासाठी नवीन स्तोत्र गा. दूरवरच्या देशांतील सर्व लोकांनो, समुद्रावरून सफर करणाऱ्या सर्वानो, समुद्रातील सर्व प्राण्यांनो, दूरच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनो, परमेश्वराची स्तुती करा.