पृथ्वीवरील सारे काही आनंदाने देवाचा जय जयकार करीत आहे.
Cross references
अखेर सर्व इस्राएल लोकांनी करार कोश आणला. जयघोष करत रण-शिंगाच्या नादांत, कर्णे, झांजा, सतारी, वीणा वाजवत त्यांनी तो आणला.
पृथ्वीवरील समस्त लोकहो, परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराने आपल्याला वाचवल्याची शुभवार्ता रोज सर्वांना सांगा.
देवासाठी गाणे म्हणा देव पुरातन आकाशातून त्याचा रथ नेतो, त्याचा जोरदार आवाज ऐका.
आनंदी राहा आणि आमची शक्ती असलेल्या देवासमोर गाणे गा, इस्राएलाच्या देवासमोर आनंदाने ओरडा.
चला, परमेश्वराची स्तुती करु या. जो खडक आपल्याला वाचवतो त्याचे गुणगान करु या.
परमेश्वराने ज्या नवीन गोष्टी केल्या त्यांची स्तुती करण्यासाठी नवे गाणे गा. सगळ्या जगाने परमेश्वराच्या स्तुतीचे गाणे गावे.
त्याच्या भक्तांना इस्राएलाच्या लोकांशी असलेला देवाचा प्रामाणिकपणा आठवला. दूरच्या प्रदेशातील लोकांना देवाची वाचवण्याची शक्ती दिसली.
हे पृथ्वी, परमेश्वरासाठी गा.
सर्व देशांनो, परमेश्वराची स्तुती करा. सर्व लोकांनो परमेश्वराची सुती करा.
स्तुती कर. परमेश्वराची स्तुती कर.
जगाच्या कानाकोपऱ्यातून देवाचे स्तुतिस्तोत्र आपल्याला ऐकायला येतील. ह्या गीतांतून खऱ्या देवाची स्तुती असेल. पण मी म्हणतो, “पुरे पुष्कळ झाले. मी ज्या गोष्टी पाहतो त्या भयानक आहेत. लोकांच्या विरूध्द विश्वासघातकी उठले आहेत. व त्यांना त्रास देत आहेत.