Home Bibles रोमकरांस 14:22 · मराठी बायबल
रोमकरांस 14:22 · मराठी बायबल

तुझा जो विश्वास आहे तो देवासमोर तुझ्या ठायी असू दे. ज्याला योग्य आहे असे वाटते व त्यामुळे जो स्वत:चा द्वेष करीत नाही तो धन्य.

Cross references

प्रेषितांचीं कृत्यें 24:16

यासाठी देवापुढे आणि मनुष्यांपुढे आपला विवेक शुद्ध असावा याचा मी नेहमी आटोकाट प्रयत्न करीत असतो.

रोमकरांस 7:15

मी काय करतो हे मला माहीत नाही कारण काय करायचे हे मला माहीत नाही. कारण ज्या गोष्टींचा मी द्वेष करतो, त्याच गोष्टी मी करतो.

रोमकरांस 7:24

मी अत्यंत दु:खी मनुष्य आहे! मरणाधीन असलेल्या शरीरापासून मला कोण सोडवील?

रोमकरांस 14:2

एखाद्याचा विश्वास असा असतो की, तो सर्व गोष्टी खाऊ शकतो, परंतु दुर्बल मनुष्य भाजीच खातो.

रोमकरांस 14:5

एखादा मनुष्य एक दिवस दुसऱ्या दिवसापेक्षा अधिक मानतो परंतु दुसरा मनुष्य प्रत्येक दिवस सारखाच मानतो. प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री करुन घ्यावी.

रोमकरांस 14:14

मला माहीत आहे आणि मी जो प्रभु येशूमध्ये आहे त्या माझी खात्री झाली आहे की, जो पदार्थ खाण्यास अशुद्ध आहे असे समजतो त्याशिवाय कोणताही पदार्थ मूळचा अशुद्ध नाही. त्याच्यासाठी ते अशुद्ध आहे.

रोमकरांस 14:23

जर तो पुढे जाऊन आपण हे टाळावे असा विश्वास ठेवूनखातो तो देवासमोर दोषी ठरतो. कारण त्याची कृति विश्वासावर आधारित नाही, ते पाप आहे.

2 करिंथकरांस 1:12

कारण आम्हाला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सद्सद्विवेकबुद्धीची साक्ष होय. ती अशी की आम्ही मानवी ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रतेने व प्रामणिकपणे जगात व विशेषकरुन तुमच्याजवळ वागलो.

गलतीकरांस 6:1

बंधूंनो, कोणी दोषात सापडला, तर तुम्ही जे आध्यात्मिकदृष्ट्या पुढारलेले आहात त्या तुम्ही त्याला सुधारावे. पण तेसौम्यतेच्या आत्म्याने हे करा. आणि स्वत:कडे लक्ष ठेवा. यासाठी की तुम्हीही मोहात पडू नये.

याकोब 3:13

तुमच्यामध्ये कोण शहाणा व ज्ञानाने भरलेला आहे? त्याने त्याचे शहाणपण त्याच्या चांगल्या वागणुकीने दाखवावे. नम्रतेने केल्या जाणाऱ्या कृतीद्वारे त्याने आपले शहाणपण दाखवावे.

1 योहान 3:21

प्रिय मित्रांनो, वाईट करण्याबद्दल जर आमची अंत:करणे आम्हांला दोष देत नाहीत तर देवाकडे जाण्यासाठी आम्हांलाखात्री आहे.

Interlinear

Choose Theme