Home Bibles 2 करिंथकरांस 7:13 · मराठी बायबल
2 करिंथकरांस 7:13 · मराठी बायबल

यामुळे आम्हास उत्तेजन मिळाले.आमच्या स्वत:च्या उत्तेजनाशिवाय आणखी आम्ही विशेषत: तीताला आनंदीत पाहून आम्हांला आनंद झाला कारण त्याचा आत्मा तुम्हा सर्वांमुळे ताजातवाना झाला आहे.

Cross references

रोमकरांस 12:15

जे आनंद करतात त्यांच्याबरोबर आनंद करा. रडणाऱ्यांबररोबर रडा.

रोमकरांस 15:32

यासाठी की, देवाच्या इच्छेने मी तुम्हांकडे आनंदाने यावे आणि तुम्हांबरोबर ताजेतवाने व्हावे.

1 करिंथकरांस 12:26

जर शरीराचा एक अवयव दुखत असेल तर सर्व अवयव त्याच्याबरोबर दु:ख सोसतात, एका अवयवाचा सन्मान झाला तर सर्व अवयव त्याच्याबरोबर आनंदीत होतात.

1 करिंथकरांस 13:5

ती गर्वाने फुगत नाही. ती अयोग्य रीतीने वागत नाही. ती स्वार्थी नाही, ती चिडत नाही. तिच्याविरुद्ध केलेल्याची नोंद ती ठेवीत नाही,

1 करिंथकरांस 16:13

सावध असा, तुमच्या विश्वासात बळकट राहा.

2 करिंथकरांस 2:3

आणि मी तुम्हांस हे यासाठी लिहिले की, मी आल्यावर ज्यांच्यापासून मी आनंदी व्हावे त्यांच्यापासून मला दु:ख होऊ नये. मला तुम्हा सर्वांविषयी विश्वास आहे की, माझा आनंद तो तुम्हा सर्वांचादेखील आहे.

2 करिंथकरांस 2:13

माझा भाऊ तीत मला तेथे सापडला नाही, म्हणून माझ्या आत्म्याचे सामाधान झाले नाही. पण तेथील लोकांचा निरोप घेऊन मी मासेदोनियास गेलो.

2 करिंथकरांस 7:6

पण जे हताश झाले आहेत त्याचे सांत्वन देव करतो, त्याने तीताच्या येण्याने आमचे सांत्वन केले.

2 करिंथकरांस 7:15

आणि जेव्हा त्याला तुमचा आज्ञाधारकपणा आठवतो तेव्हा त्याचे तुमच्या विषयीचे प्रेम अधिकच वाढते. त्याचा स्वीकार तुम्ही भीत व कांपत केला.

फिलिप्पैकरांस 2:28

म्हणून, अधिक अधीरतेने, मी त्याला पाठवित आहे. यासाठी की जेव्हा तुम्ही त्याला पाहाल तेव्हा पुन्हा एकदा तुम्ही आनंदी व्हाल आणि मी निश्रिंत असेन.

2 तीमथ्थाला 1:16

अनेसिफराच्या घरावर प्रभु दया दाखवो. कारण त्याने अनेकदा माझे समाधान केले आहे. आणि माझ्या तुरूंगात असण्याची त्याला लाज वाटली नाही.

फिलेमोना 1:20

होय बंधु, प्रभूमध्ये मला तुझ्यापासून काही फायदा हवा आहे. ख्रिस्तामध्ये माझे अंत:करण उल्हासित कर.

1 पेत्र 3:8

शेवटी सारांश हा की, तुम्ही सर्वजण एकमेकांशी विचार व भावना यांच्या ऐक्याने, सहानुभूतीने आपल्या भाऊबहिणींशी प्रेमाने, दयाळूपणे आणि नम्रतेने राहा.

Interlinear

Choose Theme