Home Bibles प्रकटीकरण 9:21 · मराठी बायबल
प्रकटीकरण 9:21 · मराठी बायबल

या लोकांनी इतरांना मारण्यापासून आपली अंत:करणे बदलली नाहीत खूनचेटके तसेच लैंगिक पापांपासून आणि चोरीपासून परावृत्त झाले नाहीत.

Cross references

यशया 47:9

एके दिवशी, एका क्षणात तुझ्याबाबत पुढील दोन गोष्टी घडतील. पहिली तू तुझी मुले गमावशील आणि नंतर दुसरी म्हणजे तू तुझा पती गमावशील. हो! ह्या गोष्टी तुझ्याबाबत खरोखरच घडतील. तुझी सर्व जादू आणि तुझ्या प्रभावी युक्त्या तुला वाचविणार नाहीत.

यशया 47:12

“जादूटोणा आणि चेटूक शिकण्यासाठी तू आयुष्यभर मेहनत केलीस. तेव्हा आता त्याचा उपयोग करायला सुरवात कर. कदाचित् त्या युक्त्या तुझ्या उपयोगी पडतील; कदाचित् तू कोणाला घाबरवू शकशील.

यशया 57:3

“चेटकिणीच्या मुलांनो, इकडे या. तुमच्या वडिलांनी व्यभिचार केला. त्यामुळे ते अपराधी आहेत. तुमची आई देहविक्रय करते. तुम्ही इकडे या.

दानीएल 7:21

“मी पाहत असतानाच, त्या लहान शिंगाने देवाच्या खास माणसांवर हल्ला करून लढण्यास सुरवात केली. ते शिंग लोकांना ठार करू लागले.

दानीएल 11:33

सुज्ञ यहूदी पुष्कळ लोकाना शिकवतील आणि इतर लोकांना घडणाऱ्या गोष्टी समजावून सांगतील पण त्यांच्यापैकी काहीजणांना सुध्दा छळ सोसावा लागेल.अशा काह?ना तलवारीने मारले जाईल ,काह?ना जाळ?ण्यात येईल,किंवा तूरूंगात टाकण्यात येईल.काहिं?ची घरे आणि वस्तु काढून घेण्यात येनील.

मलाखी 3:5

मग मी तुमच्याकडे न्याय निवाडा करण्यासाठी येईन. लोकांनी केलेल्या वाईट गोष्टी न्यायाधीशाला सांगणाऱ्या माणसाप्रमाणे मी असेन काही लोक दुष्टपणे जादूटोणा करतात. काही व्यभिचाराचे पाप करतात. काही खोटी वचने देतात. काही आपल्या मजुरांना फसवितात. ते मजुरांना कबूल केल्याप्रमाणे मजुरी देत नाहीत. लोक विधवांना व अनाथांना मदत करीत नाहीत. परक्याला कोणी मदत करीत नाही. माझा लोक मान राखत नाहीत.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.

मत्तय 15:19

कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जारकर्मे, खोट्या साक्षी, निंदा ही अंत:करणातून बाहेर निघतात.

2 करिंथकरांस 12:21

म्हणजे मी पुन्हा आल्यावर माझा देव मला तुम्हाजवळ नीच करील. आणि ज्यांनी पूर्वी पाप केले होते आणि आपण केलेल्या जारकर्माचा, अशुद्धपणाचा, व कामातुरपणाचा त्याग केला नाही, व त्यांच्याबद्दल पश्र्चात्ताप केला नाही, अशा अनेकांसाठी मला शोक करावा लागेल.

गलतीकरांस 5:20

मूर्तिपूजा, चेटूक, द्वेष, मारामारी,मत्सर, राग, स्वार्थी हेवेदावे, पक्षभेद,

प्रकटीकरण 11:7

आणि जेव्हा दोन साक्षीदार त्यांचा संदेश देण्याचे संपवतील तेव्हा त्या अभांग दऱ्यातून येणारा प्राणी त्यांच्याशी लढाईकरील. प्राणी त्यांचा पराभव करील व, त्यांना मारुन टाकील.

प्रकटीकरण 13:7

देवाच्या पवित्रलोकांविरुद्ध युद्ध करण्यास व त्यांना पराभूत करण्यास त्या प्राण्याला शक्ति देण्यात आली. त्या प्राण्याला प्रत्येक वंश, जमात,भाषा आणि राष्ट्रांतील लोकांवर अधिकार देण्यात आला आहे.

प्रकटीकरण 13:13

हे दुसरे श्र्वापद मोठी चिन्हे करते. लोक पाहत असताना तोस्वर्गातून पृथ्वीवर अग्नीसुद्धा येईल असे करतो

प्रकटीकरण 13:15

दुसऱ्या प्राण्याला पहिल्या प्राण्याच्या मूर्तीला जीवन देण्यासाठी शक्ति देण्यात आली. मग ती मूर्तीबोलेल व जे लोक तिची भक्ति करीत नाहीत त्यांना ठार मारण्याची आज्ञा देईल.

प्रकटीकरण 14:8

मग पहिल्या देवदूताच्या मागे दुसरा देवदूतगेला आणि म्हणाला, “तिचा नाश झालेला आहे! बाबेल हे मोठे शहर नष्ट झाले आहे. त्या नगरीने सर्व राष्ट्रांना तिच्याव्यभिचाराचा द्राक्षारस व देवाचा राग प्यायला लावला.”

प्रकटीकरण 16:6

लोकांनी तुझ्या पवित्र लोकांचे रक्त सांडले. तुझ्या संदेष्ट्यांचे रक्त सांडले आता तू त्या लोकांना रक्त प्यावयास दिले आहेस.कारण ते याच पात्रतेचे आहेत.”

प्रकटीकरण 17:2

पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी व्यभिचार केला. आणितिच्या लैंगिक पापाच्या द्राक्षारसाने पृथ्वीवरील लोक धुंद झाले आहेत.”

प्रकटीकरण 17:5

तिच्या कपाळावर नाव लिहिले होते.त्या नावाला गुपित अर्थ आहे. त्यावर असे लिहीले होते:

प्रकटीकरण 18:3

कारण तिच्या व्याभिचाराचा द्राक्षारस जो वेड लावणारा आहे तो सर्व राष्ट्रांनी प्याली आहेत. पृथ्वीवरील राजांनी तिच्याशीव्यभिचार केला आहे आणि पृथ्वीवरील व्यापारी तिच्या अति संपत्तीने व ऐषारामाने श्रीमंत झाले आहेत.”

प्रकटीकरण 18:23

दिव्याचा प्रकाश तुझ्यामध्ये पुन्हा कधी प्रकाशणार नाही तुइया येथे वधूवरांचा आवाज पुन्हा कधी ऐकू येणार नाही तुझेव्यापारी जगातील मोठी माणसे होती तुझ्या जादूटोण्यामुळे सर्व राष्ट्रे बहकली गेली

प्रकटीकरण 19:2

कारण त्याचे न्यायनिवाडे खरे आणि योग्य आहेत ज्या मोठ्या वेश्येने आपल्या व्यभिचारी वागण्याने सर्व पृथ्वी भ्रष्ट केली,तिला देवाने शिक्षा केली आहे. त्याच्या सेवकाच्या रक्ताचा त्याने सूड घेतला आहे.”

प्रकटीकरण 21:8

परंतु भित्रे, विस्वास न ठेवणारे अंमगळ, खुनी, व्यभिचारी, (म्हणजे लैंगिक अनीतीनेवागणारे लोक), चेटकी, मूर्तिपूजा करणारे आणि सर्व खोटे बोलणारे अशा सर्वांना अग्नीने व गंधकाने धगधगणाऱ्यातळ्यामध्ये जागा मिळेल. हे दुसरे मरण आहे.”

प्रकटीकरण 22:15

परंतु “कुत्रे” चेटकी, जादूटोणा करणारे, व्यभिचारी, मूर्तिपूजा करणारे, आणि निरनिराळ्या रीतीने लबाडीकरणारे व लबाड बोलणारे बाहेर राहतील.

Interlinear

Choose Theme