त्या ताऱ्याचे नाव कडूदवणा आणिएक तृतीयांश पाणी कडू झाले. ते कडू असलेले पाणी पिऊन पुष्कळ लोक मेले.
Cross references
तीन दिवस प्रवास केल्यानांतर ते लोक मारा नांवाच्या ठिकाणी पोहोंचले; तेथे पाणी होते परंतु ते फार कडू असल्यामुळे लोकांना ते पिववेना, (म्हणूनच त्या ठिकाणाचे नांव मारा पडले).
आपल्या परमेश्वर देवापासून परावृत होऊन त्यांच्या दैवतांच्या भजनी लागलेला कोणी पुरुष, बाई, एखादे कुटुंब किंवा कूळ येथे नाही ना याची खात्रीकरुन घ्या. अशी माणसे विषवल्लीसमान असतात.
पण नामी म्हणाली, “मला नामी (आनंदी) का म्हणता? ‘मारा’(म्हणजे कष्टी दु:खी)म्हणा. सर्वशक्तिमान देवाने मला फार दु:ख दिले आहे.
पण शेवटी त्यामुळे कटुता व दु:खच मिळेल. ते दु:ख विषापेक्षाही कडवट असले. आणि तलवारीपेक्षी धारदार असेल.
सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “लवकरच मी यहूदाच्या लोकांना कडू अन्न खायला लावीन, विषारी पाणी प्यायला लावीन.
सर्वशक्तिमान परमेश्वर संदेष्ट्यांबद्दल म्हणतो, “मी त्या संदेष्ट्यांना शिक्षा करीन. विषमिश्रित अन्न खाण्यासाखी वा जहरमिश्रित पाणी पिण्यासारखी ती शिक्षा असेल. संदेष्ट्यांनी हा आध्यात्मिक आजार आणला व तो सर्व देशात पसरला म्हणून मी त्यांना शिक्षा करीन. हा आजार यरुशलेममधील संदेष्ट्यांकडून आला.”
परमेश्वराने माझ्याभोवती दु:ख व त्रास ह्यांच्या भिंती उभारल्या. त्यांने दु:ख व त्रास माझ्याभोवती उभे केले.
परमेश्वरा, लक्षात ठेव. मी फार दु:खी आहे, व मला घर नाही. तू दिलेल्या कडू विषाचे (शिक्षेचे) स्मरण कर.
तुम्ही मदतीसाठी परमेश्वराची याचना करावी. देवानेच कृत्तिका व मृगशीर्ष यांची निर्मिती केली. तो परमेश्वरच अंधाराचे रूपांतर सकाळच्या उजेडात करतो. तोच दिवसाचे परिवर्तन अंधाव्या रात्रीत करतो. समुद्रातील पाण्याला बोलावून जमिनीवर ओततो त्याचे नाव ‘याव्हे!’ तो एक मजबूत शहर सुरक्षित ठेवतो. तर दुसऱ्या भक्कम शहराचा नाश होऊ देतो.”तुम्ही चांगुलपणा विषात बदलता तुम्ही न्यायाला मारून धुळीत पडू देता.
घोडे खडकावरून धावतात का? नाही. लोक गायांच्या साहाय्याने जमीन नांगरतात का? नाही. पण तुम्ही सर्वकाही वरचे खाली करता. तुम्ही चांगुलपणा व न्याय यांचे वीष केले.
कोणीही देवाची कृपा चुकवू नये, यासाठी तिकडे लक्ष द्या आणि इकडे लक्ष द्या की, कोणतेही कडूपणाचे मूळ वाहून त्यापासून समस्या निर्माण होऊ नये व इतर लोकांची मने कलुषित करू नये, म्हणून जपा.
पहिल्या देवदूताने कर्णा वाजविला आणि रक्तमिश्रित गारा वअग्नि पृथ्वीवर टाकण्यात आले. तेव्हा पृथ्वीचा एक तृतीयांश भाग आणि एक तृतीयांश झाडे व सर्व हिरवे गवत जळून गेले.