Home Bibles आमोस 5:7 · मराठी बायबल
आमोस 5:7 · मराठी बायबल

तुम्ही मदतीसाठी परमेश्वराची याचना करावी. देवानेच कृत्तिका व मृगशीर्ष यांची निर्मिती केली. तो परमेश्वरच अंधाराचे रूपांतर सकाळच्या उजेडात करतो. तोच दिवसाचे परिवर्तन अंधाव्या रात्रीत करतो. समुद्रातील पाण्याला बोलावून जमिनीवर ओततो त्याचे नाव ‘याव्हे!’ तो एक मजबूत शहर सुरक्षित ठेवतो. तर दुसऱ्या भक्कम शहराचा नाश होऊ देतो.”तुम्ही चांगुलपणा विषात बदलता तुम्ही न्यायाला मारून धुळीत पडू देता.

Cross references

अनुवाद 29:18

आपल्या परमेश्वर देवापासून परावृत होऊन त्यांच्या दैवतांच्या भजनी लागलेला कोणी पुरुष, बाई, एखादे कुटुंब किंवा कूळ येथे नाही ना याची खात्रीकरुन घ्या. अशी माणसे विषवल्लीसमान असतात.

स्तोत्रसंहिता 36:3

त्याचे शब्द खोटे असतात त्यांना कवडीची किंमत असते तो शहाणा होत नाही किंवा सत्कृत्य करायला शिकत नाही.

स्तोत्रसंहिता 125:5

दुष्ट लोक वाईट गोष्टी करतात. परमेश्वर त्या दुष्ट लोकांना शिक्षा करील. इस्राएलमध्ये शांती नांदू दे.

यशया 1:23

तुझे सत्ताधीश बंडखोर व चोरांचे साथीदार झाले आहेत. तुझे सगळे सत्ताधीश लाच मागतात. चुकीच्या गोष्टी करण्यासाठी ते पैसे घेतात. लोकांना फसविण्यासाठी ते पगार घेतात. ते अनाथ मुलांना मदत करीत नाहीत आणि विधवांच्या गरजांकडे लक्ष देत नाहीत.”

यशया 5:7

सर्वशक्तिमान परमेश्वराच्या मालकीचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएल हा देश होय. ज्या द्राक्षवेली परमेश्वराला प्रिय आहेत त्या म्हणजे यहुदी लोक होत.परमेश्वराने न्यायाची आशा केली पण तेथे फक्त हत्याच घडली. परमेश्वराने प्रामाणिकपणाची आशा धरली पण तेथे फक्त वाईट रितीने वागविलेल्या लोकांचे आक्रोश होते.

यशया 5:20

ते लोक चांगल्या गोष्टी वाईट आहेत व वाईट गोष्टी चांगल्या आहेत असे म्हणतात. ते प्रकाशाला अंधार व अंधाराला प्रकाश समजतात. त्यांना आंबट गोड लागते व गोड आंबट लागते.

यशया 10:1

अन्यायकारक कायदे करणाऱ्यांकडे पाहा घातक निर्णय लिहिणाऱ्या लेखकांकडे पाहा, लोकांना जगणे कठीण होईल असे कायदे ते करतात.

यशया 46:12

“तुमच्यातील काहीजणांना आपल्याजवळ प्रचंड सामर्थ्य आहे असे वाटते. पण तुम्ही सत्कृत्ये करीत नाही, माझे ऐका.

यशया 59:13

आम्ही पाप केले आणि परमेश्वराविरूध्द गेलो. आम्ही त्याच्यापासून दूर गेलो आमी त्याला सोडले. आम्ही देवाच्याविरूध्द दुष्ट बेत केले. आम्ही वाईट गोष्टींचा विचार केला व मनात दुष्ट बेत केले.

यहेज्केल 3:20

“किंवा एखादा सज्जन चांगले वागणे सोडून देईल. मी त्याच्या मार्गात असे काही ठेवीन की तो पडेल (पाप करील). तो दुष्कृत्ये करायला लागेल, म्हणून मरेल. तो पाप करीत होता व तू त्याला सावध केले नाहीस म्हणून तो मरेल. अशा वेळी त्याच्या मृत्यूबद्दल मी तुला जबाबदार धरीन. त्याने केलेली चांगली कृत्ये लोक विसरुन जातील.

यहेज्केल 18:24

“कदाचित् भला माणूस चांगुलपणा सोडून देईल. वाईट माणसाने पूर्वी केलेली भयानक दुष्कृत्ये तो करील व सन्मार्ग सोडील. (असा माणूस जिवंत राहील का?) अशा रीतीने, त्या माणसाने वाईट मार्गाला लागून दुष्कृत्ये केल्यास, त्याच्या पूर्वीच्या सत्कृत्यांची आठवण देव ठेवणार नाही. तो देवाविरुद्ध वागून पापे करु लागला, हेच देवाच्या लक्षात राहील. म्हणून तो त्याच्या पापांचे फळ भोगेल. म्हणजेच मरेल.”

यहेज्केल 33:12

“मानवपुत्रा, तू तुझ्या लोकांना असेही सांग ‘जर एखादा सज्जन कुमार्गाला लागून पाप करु लागला, तर त्याने पूर्वी केलेल्या चांगल्या गोष्टी त्याला वाचवू शकणार नाहीत. तसेच एखादा पापापासून परावृत झाला, तर त्याची भूतकाळातील पापे त्याचा नाश करु शकणार नाहीत. तेव्हा लक्षात ठेवा, पूर्वी केलेली सत्कृत्ये, आता तुम्ही दुष्कत्ये करु लागल्यास तुम्हाला वाचविणार नाहीत.’

यहेज्केल 33:18

जर सज्जन सत्कृत्ये सोडून दुष्कृत्ये करु लागला, तर त्याच्या पापामुळे तो मरेल.

होशेय 10:4

ते वचने देतात पण ते फक्त खोटो बोलत असतात. ते आपला शब्द पाळत नाहीत. ते दुसऱ्या देशांबरोबर करार करतात. परमेश्वराला ते करार आवडत नाहीत. न्यायाधीश नांगरलेल्या शेतात वाढणाऱ्या विषारी तणाप्रमाणे आहेत

आमोस 5:11

तुम्ही अन्यायाने गरिबांकडून कर घेता, त्याच्याकडून गव्हाचा खंड वसूल करता. तुम्ही कौरीव दगडांची दिमाखदार घरे बांधता खरी, पण त्यात तुम्ही रहाणार नाही. तुम्ही द्राक्षाच्या सुंदर बागा लावता, पण त्यापासून निघणारा द्राक्षरस तुम्ही पीणार नाही.

आमोस 6:12

घोडे खडकावरून धावतात का? नाही. लोक गायांच्या साहाय्याने जमीन नांगरतात का? नाही. पण तुम्ही सर्वकाही वरचे खाली करता. तुम्ही चांगुलपणा व न्याय यांचे वीष केले.

मीखा 3:9

याकोबच्या नेत्यांनो आणि इस्राएलच्या शास्त्यांनो, माझे ऐका! तुम्ही योग्य चालीरीतीचा तिरस्कार करता. सरळ गोष्टीला तुम्ही वाकडी करता.

हबक्कूक 1:4

कायदा दुबळा झाला असल्याने, लोकांना योग्य न्याय मिळत नाही. दुष्ट सज्जनांवर विजय मिळवितात. म्हणजेच कायदा न्याय राहिलेला नाही. न्यायाचा जय होत नाही.

हबक्कूक 1:12

त्यानंतर हबक्कूक म्हणाला, “परमेश्वरा, तू सनातन परमेश्वर आहेस तू माझा कधीही न मरणारा पवित्र, देव आहेस परमेश्वरा, जे केलेच पाहिजे, ते करण्यासाठीच तू खास्द्यांना निर्मिले आहेस आमच्या खडका, यहूद्यांच्या लोकांना शिक्षा करण्यासाठी तू त्यांना निर्मिले आहेस.

सफन्या 1:6

काही लोकांनी परमेश्वराकडे पाठ केली. त्यांनी परमेश्वराला अनुसरायचे सोडले. मदतीसाठी परमेश्वराला हाक मारायचे बंद केले, अशांना मी त्या ठिकाणाहून उठवीन.”

Interlinear

Choose Theme