Home Bibles प्रकटीकरण 4:9 · मराठी बायबल
प्रकटीकरण 4:9 · मराठी बायबल

जेव्हा जेव्हा ते जिवंत प्राणी सिंहासनावर बसलेल्याचा गौरव, सन्मान व उपकारस्तुति करीत होते आणि व जो सिंहासनावरबसलेला होता तो अनंतकाळपर्यंत जगत राहणारा आहे,

Cross references

निर्गम 15:18

परमेश्वर सदासर्वदा राज्य करो!”

स्तोत्रसंहिता 47:8

देव त्याच्या पवित्र सिंहासनावर बसतो. तो सगळ्या देशांवर राज्य करतो.

स्तोत्रसंहिता 48:14

देव खरोखरच नेहमी आपला देव असेल. तो आपल्याला सदैव मार्गदर्शन करेल.

दानीएल 4:34

ह्या काळाच्या अखेरीला मी नबुखद्नेस्सरने स्वर्गाकडे पाहिले आणि माझे मन ताव्व्यावर आले मग मी परात्पर देवाचे स्तवन केले. त्या चिरंतनाचा मी मान ठेवला त्याचे उपकार मानले.देवाचे प्रभुत्व अंखड आहे. त्याचे राज्य पिढ्यान्पिढ्या राहणारे आहे.

दानीएल 12:7

“तागाचे कपडे परिधान केलेल्या व नदीच्या पाण्यावर उभ्या राहिलेल्या माणसाने आपले, उजवा व डावा दोन्ही हात स्वर्गाकडे उंचावले आणि त्याने चिरंतर देवाची शपथ घेऊऩ वचन देताना मी ऐकले, तो म्हणाला तो काळ, एक वेळ, अनेक वेळा, (अ) आणि अर्धावेळेचा असेल. पवित्र लोकांच्या शक्तीचा बीमोड केला जाईल आणि मग या सर्व गोष्टी अखेरीला खऱ्या ठरतील.”

इब्री लोकांस 7:8

एका बाबतीत म्हणजेच लेव्यांच्या बाबतीत, जो मनुष्य मरतो तो दशमांश गोळा करतो, पण दुसऱ्या बाबतीत म्हणजे मलकीसदेकाच्या बाबतीत, पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे दशमांश अशा व्यक्तीने घेतला की जी अजूनही जिवंत आहे.

इब्री लोकांस 7:25

म्हणून, जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्यांना तो अनंतकाळासाठी तारण्यास समर्थ आहे. कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो सदैव जिवंत आहे.

प्रकटीकरण 1:18

मी मेलो होतो, पण पाहा; मीअनंतकाळासाठी जिवंत आहे! आणि माइया जवळ मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या आहेत.

प्रकटीकरण 5:13

प्रत्येक निर्माण केलेली वस्तु आकाशात व पृथ्वीवर, पृथ्वीखाली व समुद्रातील अवघ्यांना मी असे गाताना ऐकले की,“जो सिंहासनावर बसतो त्याला व कोकऱ्याला स्तुति, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य अनंतकाळपर्यंत असो!”

प्रकटीकरण 7:11

सर्व देवदूत सिंहासनाभोवती उभे होते आणिवडिलजनांच्या आणि चार प्राण्यांच्या भोवती उभे होते. ते सिंहासनासमोर पालथे पडले आणि त्यांनी देवाची आराधना केली.

प्रकटीकरण 10:6

जो अनंतकाळजगतो, ज्याने आकाश व त्यातील सर्व काही बनविले, पृथ्वी व तीवरील, त्याच्या नावाने शपथ वाहिली. आणि म्हणाला,“आता आणाखी विलंब होणार नाही!

प्रकटीकरण 15:7

मग सात देवदूतांना चार जिवंत प्राण्यांपैकी एकाने सात सोनेरी वाट्या दिल्या जो देव अनंतकाळपर्यंत राहतो त्याच्या रागानेत्या वाट्या भरल्या.

Interlinear

Choose Theme