Home Bibles प्रकटीकरण 7:11 · मराठी बायबल
प्रकटीकरण 7:11 · मराठी बायबल

सर्व देवदूत सिंहासनाभोवती उभे होते आणिवडिलजनांच्या आणि चार प्राण्यांच्या भोवती उभे होते. ते सिंहासनासमोर पालथे पडले आणि त्यांनी देवाची आराधना केली.

Cross references

स्तोत्रसंहिता 45:11

राजाला तुझे सौंदर्य आवडते. तो तुझा नवा नवरा (स्वामी) असेल. तू त्याला मान देशील.

स्तोत्रसंहिता 97:7

लोक त्यांच्या मूर्तीची पूजा करतात. ते त्यांच्या “देवाला” नावजतात. परंतु त्या लोकांना लाज वाटेल. त्यांचे “देव” परमेश्वरापुढे झुकतील आणि त्याची प्रार्थना करतील.

स्तोत्रसंहिता 103:20

देवदूतांनो, परमेश्वराची स्तुती करा. देवदूतांनो, तुम्ही देवाची आज्ञा पाळणारे सामर्थ्यवान सैनिक आहात. तुम्ही देवाचे ऐकता आणि त्याची आज्ञा पाळता.

स्तोत्रसंहिता 148:1

परमेश्वराची स्तुती करा. स्वर्गातल्या देवदूतांनो स्वर्गातून परमेश्वराची स्तुती करा.

मत्तय 4:10

तेव्हा येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापासून दूर हो! कारण असे लिहिले आहे की‘देव जो तुझा प्रभु त्याचीच उपासना कर आणि केवळ त्याचीच सेवा कर.”‘ अनुवाद 6:13

योहान 5:23

देवाने हे अशासाठी केले की, लोक जसा पित्याचा सन्मान करतात, तसा त्यांनी पुत्राचाही करावा. जर कोणी पुत्राचा मान राखीत नाही, तर तो पित्याचाही मान राखीत नाही. पित्यानेच पुत्राला पाठविले आहे.

इब्री लोकांस 1:6

आणि पुन्हा, देव जेव्हा त्याच्या पुत्राला जगामध्ये आणतो, तो म्हणतो,“देवाचे सर्व देवदूत त्याची उपासना करोत.”अनुवाद 32:43

प्रकटीकरण 4:4

सिंहासनाभोवती चोवीस आसने होती, आणि त्या आसनांवर शुभ्र कपडे घातलेले व डोक्यावर सोन्याचा मुगुट असलेलेचोवीस वडील बसले होते.

प्रकटीकरण 4:6

तसेच सिंहासनासमोर काचेच्या समुद्रासारखे काहीतरीदिसत होते. ते स्फटिकासारखे स्पष्ट होते.मध्यभागी, सिंहासनाभोवती चार जिवंत प्राणी होते आणि ते डोळ्यांनी भरले होते. पुढे डोळा, मागे डोळे.

प्रकटीकरण 4:10

तेव्हा तेव्हा जो सिंहासनावर बसला होता आणि अनंतकाळपर्यंतराहतो त्याच्यासमोर चोवीस वडील पाया पडत होते आणि त्याची उपासना करीत होते. ते आपले मुगुट सिंहासनासमोर ठेवतहोते. व म्हणत होते की:

प्रकटीकरण 5:11

मग मी पाहिले सिंहासन आणि, चार जिवंत प्राणी व वडीलजन यांच्या सभोवती अगणित देवदूतांची वाणी ऐकली, त्यांचीसंख्या अयुतांची अयुते व हजारो हजार होती.

प्रकटीकरण 11:16

मग जे चोवीस वडील सिंहासनावर बसले होते, ते आपल्या चेहऱ्यावर पडले त्यांनी आणि देवाची भक्ति केली. हे वडीलदेवासमोर त्यांच्या सिंहासनावर बसले.

प्रकटीकरण 15:4

हे प्रभु, सर्व लोक तुला घाबरतील सर्व लोक तुझ्या नावाची स्तुति करतील. फक्त तूच पवित्र आहेस सर्व लोक येऊन तुझीउपासना करतील कारण तुझी नीतीमत्त्वाची कृत्ये प्रकट झाली आहेत.”

प्रकटीकरण 19:4

मग चोवीस वडीलजन आणि चार जिवंत प्राणी जो देव सिंहासनावर बसला आहे त्याच्या पाया पडले व त्यांनी त्याचीउपासना केली. ते म्हणाले:“आमेन, हालेलुया!”

प्रकटीकरण 22:9

परंतु तोदेवदूत मला म्हणाला, “असे करु नको. मी तुझ्याबरोबर आणि तुझे भाऊ संदेष्टे, जे ह्या पुस्तकात नमूद केलेल्या वचनांचेपालन करतात, त्यांच्याबरोबर काम करणारा देवाचा एक सेवक आहे. देवाची उपासना कर!”

Interlinear

Choose Theme