Home Bibles प्रकटीकरण 13:2 · मराठी बायबल
प्रकटीकरण 13:2 · मराठी बायबल

हा पशू चित्त्यासारखा दिसत होता. त्याचे पाय अस्वलाच्यापायासारखे होते. त्याला सिंहाच्या तोंडासारखे तोंड होते. त्या प्रचंड सापाने त्या प्राण्याला त्याची शक्ति, त्याचे शिंहासनआणि मोठा अधिकार दिला.

Cross references

1 शमुवेल 17:34

पण दावीद म्हणाला, “मी माझ्या वडिलांची शेरडे-मेंढरे राखतो. एकदा एक सिंह आणि अस्वल येऊन कळपातील कोकरु उचलून घेऊन गेले.

2 राजे 2:24

अलीशाने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले आणि शापवाणी उच्चारली. त्याबरोबर जंगलातून दोन अस्वले बाहेर आली आणि त्यांनी या मुलांवर हल्ला केला. बेचाळीस मुलांच्या त्या अस्वलांनी चिंधडया केल्या.

स्तोत्रसंहिता 22:21

सिंहाच्या जबड्यापासून माझे रक्षण कर. बैलाच्या शिंगापासून माझे रक्षण कर.

नीतिसूत्रे 17:12

मूर्खाला भेटण्यापेक्षा, जीची पिल्ले चोरीला गेलीत अशा चवताळलेल्या अस्वलाच्या मादीला तोंड देणे बरे!

नीतिसूत्रे 28:15

दुष्ट माणूस जेव्हा दुबळ्या लोकांवर राज्य करतो तेव्हा तो रागावलेल्या सिंहासारखा किंवा अस्वलासारखा लढाईला तयार असतो.

यशया 5:29

ते गर्जना करतात आणि त्या गर्जना एखाद्या तरूण सिंहाच्या गर्जनेइतक्या मोठ्या असतात. जे लोक त्यांच्याशी लढतात त्यांना ते गुरगुरत पकडतात. लोक झगडतात आणि पळून जाण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना वाचविणारा तेथे कोणीही नसतो.

यिर्मया 5:6

ते देवाच्या विरुद्ध गेले म्हणून जंगलातील सिंह त्यांच्यावर हल्ला करील. जंगलातील लांडगा त्यांना ठार मारील. चित्ता त्यांच्या शहराजवळ लपला आहे. शहरातून बाहेर येणाऱ्या प्रत्येकाचे तो तुकडे तुकडे करील. यहूदातील लोकांनी पुन्हा पापे केल्याने हे घडून येईल. ते, अनेक वेळा, देवापासून दूर भटकत गेले आहेत.

यिर्मया 13:23

काळा माणूस आपल्या कातडीचा रंग बदलू शकत नाही. किंवा चित्ता आपल्या अंगावरील ठिपके बदलू शकत नाही. त्याचप्रमाणे यरुशलेम, तू सुद्धा बदलणार नाहीस आणि चांगल्या गोष्टी करणार नाहीस तू नेहमीच वाईट गोष्टी करशील.

दानीएल 7:4

पहिला प्राणी सिंहासारखा होता व त्याला गरुडासारखे पंख होते. मी त्या प्राण्याचे निरीक्षण केले. त्यानंतर त्याचे पंख कापण्यात आले. तो जमिनीपासून वर उचलला गेला होता. त्यामुळे तो माणसारसाखा जमिनीवर दोन पायांवर उभा राहिला होता. त्याला मानवी हदय (मन) देण्यात आले होते.

होशेय 11:10

मी सिंहासारखी डरकाळी फोडीन. मी डरकाळी फोडताच, माझी मुले माझ्यामागून येतील ती पश्चिमेकडून भयाने थरथर कापत येतील.

होशेय 13:7

“म्हणूनच मी त्यांच्याशी सिंहासारखा वागेन. रस्त्यावर दबा धरून बसलेल्या चित्याप्रमाणे मी होईन.

आमोस 3:12

परमेश्वर म्हणतो, “जर सिंहाने मेंढीवर हल्ला केला, तर कदाचित मेंढपाळ तिला वाचवायचा प्रयत्न करील. पण तो मेंढीचा काही भागच वाचवू शकेल. तो कदाचित् मेंढीचे दोन पाय वा कानाचा तुकडाच सिंहाच्या तोंडातून ओढून काढेल. त्याचप्रकारे इस्राएलमधील बहुतांश लोक वाचणार नाहीत. शोमरोनमध्ये राहणारे लोक शय्येचा एखादा कोपरा किंवा बिछान्याच्या कापडाचा तुकडाच फक्त वाचवू शकतील.”

आमोस 5:19

सिंहापासून दूर पळणाऱ्या माणसावर अस्वलाने हल्ला करावा, अशी तुमची स्थिती होईल. घरात जाऊन भिंतीवर हात ठेवणाव्याला साप चावावा, तशी तुमची अवस्था होईल.

हबक्कूक 1:8

त्यांचे घोडे चित्यांपेक्षा चपळ आणि सूर्यास्ताच्या वेळच्या लांडग्यांपेक्षा वाईट वृत्तीचे असतील. त्यांचे घोडेस्वार दूरदूरच्या ठिकाणाहून येतील. भुकेला गरुड ज्याप्रमाणे आकाशातून एकदम झडप घालतो, त्याप्राणेच ते शत्रूंवर हल्ला करतील.

2 तीमथ्थाला 4:17

प्रभु माझ्या बाजूने उभा राहिला आणि मला सामर्थ्य दिले यासाठी की, माझ्याकडून संदेशाची पूर्ण घोषणा व्हावी व सर्व विदेश्यांनी ती ऐकावी. सिंहाच्या मुखातून त्याने मला सोडविले.

1 पेत्र 5:8

सावध आणि जागरुक असा. तुमचा वैरी जो सैतान तो गर्जना करीत फिरणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून सगळीकडे फिरत असतो.

प्रकटीकरण 12:3

मग दुसरे एक चिन्ह आकाशात दिसले: तेथे फार मोठा तांबडा साप होता. त्या सापाला सात डोकीहोती व त्या सातही डोक्यांवर एक एक मुगूट होता. त्या सापाला दहा शिंगे सुद्धा होती.

प्रकटीकरण 12:9

सापला आकाशातून खाली फेकण्यात आले. तो प्रचंड साप, सैतान म्हटलेला तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्णजगाला चकवतो. त्या सापाला त्याच्या दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात आले.

प्रकटीकरण 12:13

जेव्हा त्या प्रचंड सापाने पाहिले की त्याला पृथ्वीवर खाली फेकण्यात आले आहे तेव्हा ज्या स्त्रीने मुलाला जन्म दिलाहोता, तिच्या मागे तो लागला.

प्रकटीकरण 12:15

मग त्यासापाने आपल्या तोंडातून नदीसारखे पाणी ओतले. सापाने ते पाणी स्त्रीकडे ओतले यासाठी की तिने त्या पाण्यात वाहत जावे.

प्रकटीकरण 13:4

लोकांनी त्या प्रचंड सापाची उपासना केली कारण त्याने त्याचीशक्ति त्या श्र्वापदाला दिली होती. लोकांनी त्या प्राण्याची उपासना केली. त्यांनी विचारले, “या प्राण्याइतका सामर्थ्यशालीकोण आहे? त्याच्याविरुद्ध कोण लढाई करु शकेल?”

प्रकटीकरण 16:10

पाचव्या देवदूताने त्याची वाटी श्र्वापदाच्या सिंहासनावर ओतली. आणि प्राण्याच्या राज्यावर अंधार पसरला. दु:खामुळेलोक त्यांच्या जिभा चावत होते.

प्रकटीकरण 17:12

“जी दहा शिंगे तू पाहिलीस ते ज्यांना अजून सत्ताधिकार मिळाला नाही, असे दहा राजे आहेत. पण त्यांना श्र्वादाबरोबरएका घटकेसाठी राजासारखा अधिकार मिळेल.

प्रकटीकरण 19:20

त्या श्र्वापदाला पकडण्यात आले. त्या प्राण्याच्या समक्ष ज्या खोट्यासंदेष्ट्याने चमत्कार केले होते, त्याला देखील प्राण्याबरोबर पकडण्यात आले. प्राण्याचा शिक्का अंगावर असलेल्या आणित्याच्या मूर्तीची उपासना करणाऱ्या लोकांना त्या खोट्या संदेष्ट्याने चमत्कार दाखवून फसविले, त्या दोघांना (प्राणी आणिखोटा संदेष्टा यांना) धगधगत्या गंधकाच्या अग्नीने भरलेल्या तळ्यात जिवंत असे टाकण्यात आले.

प्रकटीकरण 20:2

त्या देवदूताने त्या जुनाट अजगराला म्हणजे सैतानाला धरले आणि एक हजार वर्षासाठी साखळदंडानेबांधून ठेवले.

Interlinear

Choose Theme