तू त्याला युध्द जिंकू दिले नाहीस. तू त्याचे सिंहासन जमिनीवर फेकलेस.
Cross references
करारकोशाचे हरण झाले, सासरा व नवरा यांना मृत्यू आला म्हणून तिने मुलाचे नाव ईखाबोद (हरपलेले वैभाव) असे ठेवले.
नवा राजा आपले म्हणणे मानत नाही हे इस्राएली लोकांच्या लक्षात आले. तेव्हा ते राजाला म्हणाले, “आम्ही दावीदाच्या घराण्यातील थोडेच आहोत. काय? नाही! इशायच्या जमिनीत आम्हाला थोडाच वाटा मिळणार आहे काय? नाही! तेव्हा इस्राएलींनो, जा आपापल्या घरी. करु दे या दावीदाच्या मुलाला आपल्या घराण्यापुरतेच राज्य.” एवढे बोलून ते निघून गेले.
रहबामच्या कारकिर्दीचे पाचवे वर्ष चालू असताना मिसरचा राजा शिशक याने यरुशलेमवर स्वारी केली.
तू तुझा करार पाळला नाहीस. तू राजाचा मुकुट धुळीत फेकून दिलास.
सोने कसे निस्तेज झाले आहे पाहा! चांगले सोने कसे बदलले आहे बघा! रत्ने सगळीकडे पसरली आहेत. रस्त्याच्या नाक्या-नाक्यावर ती विखुरली आहेत.
त्याच्या डोक्यावरील दहा शिंगाबद्दलही मला जाणून घ्यायचे होते. उगवलेल्या लहान शिंगाबद्दलही मला उत्सुकता होती. त्या लहान शिंगाने इतर दहा शिंगातील तीन उपटून टाकली. ते इतर शिंगातील तीन उपटून टाकली. ते इतर शिंगाच्या मानाने क्षुद, होते त्याला डोळे होते, तोंड होते, आणि ते तोंड सतत बढाया मारीत होते.
तर कोणीही तुम्हाला कोणत्याही प्रकारे फसवू नये. म्हणून सावध असा. मी असे म्हणतो कारण पहिल्यांदा मोठी बंडखोरी झाल्याशिवाय प्रभूचा दिवस येणार नाही. आणि जो नाशासाठी नेमला आहे, तो नियम मोडणारा प्रकट होईल.