Home Bibles स्तोत्रसंहिता 89:43 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 89:43 · मराठी बायबल

देवा, तू त्यांना स्व:तचे रक्षण करायला मदत केलीस. तू तुझ्या राजाला युध्द जिंकायला मदत केली नाहीस.

Cross references

लेवीय 26:36

तुमच्यातील जे जगूनवाचूंन उरतील त्यांचे धैर्य आपल्या शत्रूंच्या देशात खचेल; त्यांना प्रत्येक गोष्टीची भीती वाटेल; वाऱ्याने उडविल्या जाणाऱ्या पानाप्रमाणे ते इकडे तिकडे संभोवार पळतील; कोणी तलवार घेऊन पाठीस लागल्याप्रमाणे ते पळतील. कोणी पाठीस लागले नसतानाही ते पळतील.

गणना 14:42

त्या प्रदेशात जाऊ नका. परमेश्वर तुमच्याबरोबर नाही म्हणून तुमचा सहज पराभव होऊ शकेल.

गणना 14:45

डोंगरावरच्या प्रदेशात राहणारे अमालेकी आणि कनानी लोक खाली आले आणि त्यांनी इस्राएल लोकांवर हल्ला केला. त्यांनी इस्राएल लोकांचा सहज पराभव केला आणि हर्मापर्यंत त्यांचा पाठलाग केला.

यहोशवा 7:4

तेव्हा सुमारे तीन हजार माणसे आय येथे गेली. आयच्या लोकांनी इस्राएलांची सुमारे छत्तीस माणसे ठार केली. आणि इस्राएल लोकांनी पळ काढला. त्यांचा आयच्या लोकांनी गावाच्या वेशीपासून ते दगडाच्या खाणीपर्यंत पाठलाग केला. आयच्या लोकांनी त्यांना चांगले चोपून काढले.इस्राएल लोकांनी हे पाहिले तेव्हा घाबरून त्यांच्या तोंडचे पाणी पळाले.

यहोशवा 7:8

परमेश्वरा मी माझ्या जिवाची शपथ घेतो. मला आता बोलण्यासारखे काही उरले नाही. इस्राएल शत्रूला शरण गेला आहे.

2 इतिहास 25:8

तू भले कितीही तयारी करुन लढाईत उतरलास तरी तुझा जय पराजय होणे देवाच्याच हातात आहे.”

स्तोत्रसंहिता 44:10

तू आमच्या शत्रूंना आम्हाला मागे रेटू दिलेस. शत्रूंनी आमची संपत्ती घेतली.

विलापगीत 2:17

देवाने ठरविल्याप्रमाणे केले. तो जे करीन म्हणाला होता, तसेच त्याने केले. फार पूर्वी त्याने जी आज्ञा केली होती. ती त्याने पूर्ण केली. त्याने नाश केला व त्याला दया आली नाही. तुझ्याबाबतीत जे घडले, ते पाहून तुझ्या शत्रूंना आनंद झाला. हा आनंद त्यांना देवाने मिळवून दिला. देवाने तुझ्या शत्रूंना सामर्थ्यशाली बनविले.

यहेज्केल 30:21

“मानवपुत्रा, मिसरच्या राजाचा फारोचा हात (सत्ता) मी मोडला आहे. त्याला कोणीही मलमपट्टी करणार नाही व औषधही लावणार नाही. तो बरा होणार नाही. त्यांच्या हाताला तलवार धरण्याची शक्ती येणार नाही.”

Interlinear

Choose Theme