Home Bibles स्तोत्रसंहिता 88:18 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 88:18 · मराठी बायबल

आणि परमेश्वरा, तूच माझ्या आप्तेष्टांना आणि इष्ट मित्रांना मला सोडून जाण्यास भाग पाडलेस. केवळ भयाण अंधकार माझी सोबत करत माझ्याजवळ राहिला.

Cross references

ईयोब 19:12

देव त्याचे सैन्य माझ्यावर हल्ला करण्यासाठी पाठवतो. ते माझ्याभोवती मोर्चा उभारतात. ते माझ्या डेऱ्याभोवती छावणी टाकतात.

स्तोत्रसंहिता 31:11

माझे शत्रू माझा तिरस्कार करतात आणि माझे सगळे शेजारी सुध्दा माझा तिरस्कार करतात माझे सगळे नातेवाईक मला रस्त्यात बघतात तेव्हा ते मला घाबरतात आणि मला चुकवतात.

स्तोत्रसंहिता 38:11

माझ्या आजारपणामुळे माझे मित्र आणि शेजारी मला भेटायला येत नाहीत. माझे मित्र आप्तही माझ्याजवळ येत नाहीत.

स्तोत्रसंहिता 88:8

माझे मित्र मला सोडून गेले. ज्याला कोणीही स्पर्श करु इच्छीत नाही. अशा माणसाप्रमाणे ते मला टाळतात. मी घरात बंद झालो आहे आणि मी बाहेर पडू शकत नाही.

स्तोत्रसंहिता 118:10

बऱ्याच शत्रूंनी मला घेरले होते. परंतु परमेश्वराच्या शक्तीमुळे मी माझ्या शत्रूंचा पराभव केला.

स्तोत्रसंहिता 118:11

शत्रूंनी मला पुन्हा पुन्हा घेरले, मी त्यांचा परमेश्वराच्या शक्तीने पराभव केला.

Interlinear

Choose Theme