Home Bibles स्तोत्रसंहिता 118:11 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 118:11 · मराठी बायबल

शत्रूंनी मला पुन्हा पुन्हा घेरले, मी त्यांचा परमेश्वराच्या शक्तीने पराभव केला.

Cross references

1 शमुवेल 23:26

शौल डोंगराच्या एका बाजूला तर दावीद आणि त्याची माणसे त्याच डोंगराच्या दुसऱ्या बाजूला होती. दावीद शौलपासून निसटून जाण्याच्या घाईत होता. शौल आणि त्याचे सैनिक दावीदला पकडण्यासाठी डोंगराला वेढा घालत होते.

1 इतिहास 19:10

सैन्याच्या दोन तुकड्या आपल्याविरुध्द उभ्या ठाकलेल्या असून त्यातली एक आपल्या मागे व एक पुढे आहे हे यवाबने पाहिले. तेव्हा त्याने इस्राएली फौजेतील निवडक लढवय्यांना अरामी सैन्यासमोर नियुक्त केले.

स्तोत्रसंहिता 18:41

माझ्या शत्रूंनी मदतीसाठी हाका मारल्या परंतु तेथे त्यांचे रक्षण करायला कोणीच नव्हते. त्यांनी परमेश्वराला सुध्दा बोलावले पण त्याने उत्तर दिले नाही.

स्तोत्रसंहिता 22:12

माझ्याभोवती लोक आहेत ते बळकट बैलासारखे माझ्या चहू बाजूला आहेत.

स्तोत्रसंहिता 88:17

दु:ख आणि वेदना सदैव माझ्याबरोबर असतात. मी माझ्या दु:खात आणि वेदनात बुडून मरत आहे असे मला वाटते.

स्तोत्रसंहिता 88:18

आणि परमेश्वरा, तूच माझ्या आप्तेष्टांना आणि इष्ट मित्रांना मला सोडून जाण्यास भाग पाडलेस. केवळ भयाण अंधकार माझी सोबत करत माझ्याजवळ राहिला.

Interlinear

Choose Theme