Home Bibles स्तोत्रसंहिता 85:7 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 85:7 · मराठी बायबल

परमेश्वरा, आम्हाला वाचव आणि तू आमच्यावर प्रेम करतोस ते दाखव.

Cross references

स्तोत्रसंहिता 50:23

म्हणून जर एखाद्याने कृतज्ञता पूर्वक होमार्पण केले तर तो खरोखरच मला मान देतो. जर एखद्या माणसाने त्याचे आयुष्य बदलले आणि तो चांगले वागू लागला तर मी त्याला देवाच्या रक्षणाची शक्ती दाखवेन.”

स्तोत्रसंहिता 91:16

मी माझ्या भक्तांना खूप आयुष्य देईन.” आणि त्यांना वाचवीन.

यिर्मया 33:10

“तुम्ही लोक म्हणत आहात “आमचा देश म्हणजे ओसाड वाळवंट आहे. तेथे कोणी माणसे वा प्राणी राहत नाहीत.’ यरुशलेमच्या रस्त्यांवर व यहूदाच्या शहरात सध्या शांतता आहे. पण लवकरच तेथे कोलाहल सुरु होईल.

यिर्मया 33:11

तेथे सुखाचे व आनंदाचे कल्लोळ उठतील. नव-वर-वधूंचे सुखसंवाद ऐकू येतील. परमेश्वराला अर्पण करण्यासाठी भेटी घेऊन परमेश्वराच्या मंदिरात येणाऱ्या लोकांचे आवाज ऐकू येतील. ते लोक म्हणतील, ‘परमेश्वर देवाची स्तुती करा. परमेश्वर चांगला आहे. परमेश्वराची कृपा चिरंतन आहे!’ मी यहूदासाठी चांगल्या गोष्टी करीन. म्हणून लोक असे म्हणतील. ते सर्व सुरुवातीला जसे होते तसे असेल.” देवाने ह्या गोष्टी सांगितल्या.

यिर्मया 42:12

मी तुमच्यावर कृपा करीन आणि बाबेलचा राजाही तुमच्याशी दयाळूपणाने वागेल. तो तुम्हाला तुमच्या देशात परत आणील.’

Interlinear

Choose Theme