Home Bibles यिर्मया 33:10 · मराठी बायबल
यिर्मया 33:10 · मराठी बायबल

“तुम्ही लोक म्हणत आहात “आमचा देश म्हणजे ओसाड वाळवंट आहे. तेथे कोणी माणसे वा प्राणी राहत नाहीत.’ यरुशलेमच्या रस्त्यांवर व यहूदाच्या शहरात सध्या शांतता आहे. पण लवकरच तेथे कोलाहल सुरु होईल.

Cross references

स्तोत्रसंहिता 85:7

परमेश्वरा, आम्हाला वाचव आणि तू आमच्यावर प्रेम करतोस ते दाखव.

स्तोत्रसंहिता 147:13

यरुशलेम, देव तुझे दरवाजे बुलंद बनवतो आणि देव तुझ्या शहरातल्या लोकांना आशीर्वाद देतो.

यिर्मया 32:36

“तुम्ही लोक म्हणत आहात ‘बाबेलचा राजा यरुशलेम जिंकेल ह्या नगरीचा पराभव करण्यासाठी तो युद्ध, उपासमार आणि भयंकर रोगराई ह्यांचा उपयोग करील’ पण परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो,

यिर्मया 32:43

तुम्ही लोक म्हणत आहात, ‘ही जमीन म्हणजे ओसाड वाळवंट आहे. तेथे कोणी मनुष्यप्राणी वा पशू नाहीत. बाबेलच्या सैन्याने या देशाचा पराभव केला.’ पण भविष्यकाळात, ह्या देशात लोक पुन्हा एकदा शेते खरेदी करतील.

यहेज्केल 37:11

मग परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “मानवपुत्रा, ही हाडे म्हणजे जणू काही सर्व इस्राएली कुळच आहे. इस्राएलचे लोक म्हणतात, ‘आमची हाडे सुकून गेली आहेत.आम्हाला आशा राहिलेली नाही. आमचा संपूर्ण नाश झाला आहे.’

Interlinear

Choose Theme