तुम्ही लोक संकटात होता. तुम्ही मदतीसाठी हाका मारल्या आणि मी तुमची मुक्तता केली. मी वादळी ढगात लपलो होतो आणि मी तुम्हाला उत्तर दिले. मी मरीबाच्या पाण्याजवळ तुमची परीक्षा घेतली.”
Cross references
बऱ्याच वर्षानंतर मिसरचा राजा मरण पावला. अजूनही इस्राएल लोकानां अतिशय कष्टाची कामे करावी लागत होती. त्यांनी मदतीकरिता हाका मारल्या व देवाने त्या ऐकल्या;
तेव्हा त्यांना सांग, मी म्हणतो, ‘मी तुमचा परमेश्वर आहे; मी तुम्हास वाचवीन व तुम्हांस स्वतंत्र करीन; तुम्ही मिसरच्या लोकांचे गुलाम राहणार नाही. मी माझ्या महान सामर्थ्याचा उपयोग करून मिसरच्या लोकांना भयंकर शिक्षा करीन व मग तुम्हाला सोडवीन.
फारो व त्याचे सैन्य आपणाकडे येताना इस्राएल लोकांनी पाहिले, तेव्हा ते अतिशय घाबरले; आणि मदतीसाठी ते परमेश्वराचा धावा करु लागले.
तेव्हा त्या दिवशी भल्या पहाटे परमेश्वराने मेघस्तंभातून व अग्नीस्तंभातून खाली मिसरच्या सैन्याकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडवून त्यांचा पराभव केला.
तेव्हा अशा रीतीने त्या दिवशी परमेश्वराने मिसरच्या लोकांपासून इस्राएल लोकांना वाचविले व त्यांनी ताबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर मिसरच्या लोकांची प्रेते पडलेली पाहिली.
तेव्हा इस्राएल लोक मोशेविरुद्ध उठले व त्याच्याशी भांडू लागले. ते म्हणाले, “आम्हाला प्यावयास पाणी दे.”मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्याविरुद्ध का उठला आहात? तुम्ही परमेश्वराची परीक्षा का पाहात आहात?”
शिंगाचा आवाज मोठमोठा होऊ लागला. मोशे देवाबरोबर जेव्हा जेव्हा बोलला तेव्हा तेव्हा देवाने त्याला मेघगर्जनेसारख्या आवाजाने उत्तर दिले.
“मी याव्हे तुझा प्रभू, तुझा देव आहे. तुम्ही मिसरमध्ये गुलाम होता तेव्हा मीच तुम्हाला तेथून गुलामगिरीतून सोडवून आणले.
ह्या वेळेपर्यंत तेथील लोकांनी पर्वतावरील ढगांचा गडगडाट ऐकला, विजांचा चकचकाट पाहिला व पर्वतातून धूर वर चढताना पाहिला; तेव्हा लोक घाबरले व भीतीने त्यांचा थरकांप झाला. ते पर्वतापासून दूर उभे राहिले.
त्या जागेला मरीबा असे नांव पडले. इस्राएल लोकांनी परमेश्वराबरोबर जिथे वाद घातला तीच ती जागा होती. याच जागेवर परमेश्वराने त्यांना तो किती पवित्र आहे ते दाखवले होते.
“अहरोनची मरण्याची आणि त्याच्या पूर्वजांजवळ जाण्याची वेळ आली आहे. मी इस्राएल लोकांना ज्या प्रदेशात नेण्याचे वचन दिले होते तिथे अहरोन जाणार नाही. मोशे मी हे सांगत आहे कारण तुम्ही मी मरिबाच्या पाण्याजवळ दिलेल्या आज्ञा पूर्णपणे पाळल्या नाहीत.
मी परमेश्वर, तुमचा देव आहे. मिसरमध्ये तुम्ही गुलामीत होतात तेथून मी तुम्हाला बाहेर काढले. तुम्ही आता या आज्ञा पाळा.
लेवींविषयी मोशे असे म्हणाला,“लेवी तुझा खरा अनुयायी आहे. तो थुम्मीम व उरीम बाळगतो. मस्सा येथे तू लेवींची कसोटी पाहिलीस. मरीबाच्या झऱ्याजवळ, ते तुझेच आहेत याची तू कसोटी करुन घेतलीस.
देव म्हणतो, “इस्राएलाच्या लोकांनो, तुम्ही संकटात असाल तेव्हा माझी प्रार्थना करा. मी तुम्हाला मदत करीन. आणि नंतर तुम्ही मला मान देऊ शकाल.”
परमेश्वर म्हणतो, “जर एखादा माणूस माझ्यावर विश्वास ठेवेल, तर मी त्याचे तारण करीन. जे माझे अनुयायी माझी उपासना करतात त्यांचे मी रक्षण करतो.
“आपल्या वचनाची खात्री देताना लोक म्हणतात ‘परमेश्वराचे अस्तित्व जेवढे खरे आहे, तेवढे आपले वचन पक्के आहे. मिसरच्या भूमीतून इस्राएलच्या लोकांची सुटका त्या परमेश्वरानेच केली आहे.’ पण आता देवाचा असा संदेश आहे, ‘लोक वर म्हटल्याप्रमाणे म्हणणार नाहीत. असा काळ येऊ घातलेला आहे.