Home Bibles गणना 20:24 · मराठी बायबल
गणना 20:24 · मराठी बायबल

“अहरोनची मरण्याची आणि त्याच्या पूर्वजांजवळ जाण्याची वेळ आली आहे. मी इस्राएल लोकांना ज्या प्रदेशात नेण्याचे वचन दिले होते तिथे अहरोन जाणार नाही. मोशे मी हे सांगत आहे कारण तुम्ही मी मरिबाच्या पाण्याजवळ दिलेल्या आज्ञा पूर्णपणे पाळल्या नाहीत.

Cross references

उत्पत्ति 15:15

“तू स्वत: फार म्हातारा होऊन शांतीने मरण पावशील आणि तुझे पूर्वज जेथे पुरलेले आहेत तेथे तुला मूठमाती देतील.

उत्पत्ति 25:8

त्याला दीर्घकाळ सुखी व समाधानी जीवन लाभले; मग तो अशक्त होऊन मरण पावला व आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला;

उत्पत्ति 25:17

इश्माएल एकशें सदतीस वर्षे जगला नंतर तो मेला आणि आपल्या पूर्वजांमध्ये गोळा झाला;

उत्पत्ति 35:29

आणि दीर्घ आयुष्यानंतर तो अशक्त होऊन मरण पावला. त्याचे मुलगे एसाव व याकोब यांनी त्याला त्याच्या बापाला पुरले होते त्याच जागी पुरले.

उत्पत्ति 49:29

मग इस्राएलाने त्यांना आज्ञा दिली. तो म्हणाला, “मी मरेन तेव्हा तुम्ही मला माझ्या लोकात नेऊन ठेवावे. एफ्राम हित्ती ह्याच्या शेतातील गुहेत माझ्या पूर्वजांबरोबर मला पुरावे.

उत्पत्ति 49:33

आपल्या मुलांशी हे बोलणे संपवल्यानंतर इस्राएल आपले पाय पलंगावर घेऊन झोपला व मरण पावला.

गणना 4:27

अहरोन आणि त्याचे मुलगे यांनी झालेल्या सर्व कामाची पाहणी करावी. त्यांनी गेर्षोनी लोक जे जे वाहून नेतील आणि इतर जे काही काम करतील त्यावरही नजर ठेवावी. तुम्ही त्यानी वाहावयाच्या वस्तूची कल्पना त्यांना द्यावी. ते वाहून नेत असलेल्या वस्तूची जबाबदारी त्यांच्यावर आहे असे त्यांना सांगावे

गणना 20:10

मोशे आणि अहरोन यांनी लोकांना त्या खडकासमोर भेटायला सांगितले. नंतर मोशे म्हणाला, “तुम्ही लोक नेहमी तक्रारी करीत असता. आता माझे ऐका. मी आता या खडकातून पाणी काढीन.”

गणना 27:13

तू ही जागा बघितल्यानंतर तू तुझ्या भावाप्रमाणे. अहरोनाप्रमाणे मरशील.

गणना 31:2

“मी इस्राएल लोकांना मिद्यान्यांचा सूड घ्यायला मदत करीन. मोशे, तू त्यानंतर मरशील.”101

अनुवाद 32:50

या डोंगरावर तुझे निधन होईल. तुझा भाऊ अहरोन हा जसा होर डोंगरावर मृत्यू पावल्यावर स्वजनांना मिळाला तसेच तुझे होईल.

शास्ते 2:10

जुन्या पिढीतील सर्व मृत्यू पावल्यानंतर नवीन पिढी पुढे आली. त्यांना परमेश्वराविषयी आणि परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी काय केले याविषयी काहीही माहिती नव्हती.

2 इतिहास 34:28

तुझ्या पूर्वजांकडे मी तुला नेईन.तुला शांत मरण येईल. या प्रदेशावर आणि लोकांवर जी संकटे कोसळतील ती तुला पाहायला लागणार नाहीत.”‘ हिल्कीया आणि राजाचे सेवक या सर्वांनी हा निरोप राजाला येऊन सांगितला.

Interlinear

Choose Theme