Home Bibles यहेज्केल 20:21 · मराठी बायबल
यहेज्केल 20:21 · मराठी बायबल

“पण ती मुले माझ्याविरुध्द गेली. त्यांनी माझे नियम मानले नाहीत. माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. मी सांगितलेल्या गोष्टी त्यांनी केल्या नाहीत. खरे म्हणजे, माझे नियम चांगले आहेत. माणसाने ते पाळल्यास, तो अवश्य जगेल. त्यांनी माझ्या सुट्टयांच्या विशेष दिवसांकडे दुर्लक्ष केले. मग माझा राग किती आहे, हे त्यांना कळावे म्हणून मी वाळवंटात त्यांचा संपूर्ण नाश करण्याचे ठरविले.

Cross references

गणना 21:5

त्यांनी मोशेविरुद्ध व देवविरुद्ध तक्रार करायला सुरुवात केली. लोक म्हणाले, “तू आम्हाला ह्या वाळवंटात मरण्यासाठी मिसर देशातून बाहेर का आणलेस? इथे भाकरी नाही, पाणी नाही आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत.”

गणना 25:1

इस्राएल लोक शिद्दीमात रहात असताना त्यांनी मवाबच्या बायकांबरोबर लैंगिक पाप करायला सुरुवात केली.

अनुवाद 9:23

परमेश्वराने तुम्हाला कादेश-बर्ण्या सोडण्यास सांगितले तेव्हाही तुम्ही त्याचे ऐकले नाहीत. त्याने तुम्हाला तो देत असलेला प्रदेश काबीज करायला सांगितले पण त्याचे सांगणे ऐकले नाहीत. त्याच्यावर भरवसा ठेवला नाहीत. त्याची आज्ञा पाळली नाहीत.

अनुवाद 31:27

तुम्ही फार ताठर आहात हे मला माहीत आहे. तुम्ही आपलाच ठेका चालवता. मी तुमच्याबरोबर असतानाही तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड केले आहे. तेव्हा माझ्यामागेही तुम्ही तेच कराल.

2 इतिहास 34:21

“माझ्या आणि इस्राएल व यहूदा येथे आता शिल्लक असलेल्या लोकांच्या वतीने परमेश्वराला जाऊन विचारा. या पुस्तकातील वचनांविषयी त्याला विचारा. आपल्या पूर्वजांनी परमेश्वराचे म्हणणे न जुमानल्यामुळे परमेश्वराचा आपल्यावर कोप झाला आहे. आपल्या पूर्वजांचे वर्तन या पुस्तकातील वचनांना अनुसरुन नव्हते.”

2 इतिहास 34:25

माझ्याकडे पाठ फिरवून इतर देवतांपुढे त्यांनी धूंप जाळला म्हणून मी असे करणार आहे. आपल्या दुष्कृत्यांमुळे लोकांनी मला कुध्द केले आहे. या क्रोधाचा अंगार त्यांच्यावर बरसेल आणि तो शांत होणार नाही.’

स्तोत्रसंहिता 78:10

त्यांनी देवाबरोबर झालेला त्यांचा करार पाळला नाही. त्यांनी त्याची शिकवण आचरायला नकार दिला.

स्तोत्रसंहिता 106:29

देव त्याच्या माणसांवर खूप रागावला, देवाने त्यांना खूप आजारी पाडले.

यिर्मया 32:23

इस्राएलचे लोक ह्या देशात आले आणि त्यांनी तो देश आपल्या मालकीचा केला. पण त्या लोकांनी तुझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्यांनी तुझ्या शिकवणुकीचा स्वीकार केला नाही. तुझ्या आज्ञेप्रमाणे ते वागले नाहीत. म्हणून तू इस्राएलच्या लोकांच्याबाबत भयंकर गोष्टी घडवून आणल्यास.

विलापगीत 4:11

परमेश्वराने आपला सगळा क्रोध प्रकट केला. त्यांने आपला सगळा राग बाहेर काढला. त्याने सियोनमध्ये आग लावली त्या आगीत पायापर्यंत सियोन बेचिराख झाले

यहेज्केल 7:8

आता लवकरच, तुम्हाला, मी किती रागावलो आहे, ते कळेल. मी माझा सगळा राग तुमच्यावर काढीन. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी तुम्हाला शिक्षा करीन. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी तुम्हाला शिक्षा करीन. तुम्ही केलेल्या भयंकर कर्मांची किंमत मी तुम्हाला मोजायला लावीन.

यहेज्केल 13:15

मी माझा सगळा राग त्या तटबंदीवर व तिच्यावर गिलावा देणाऱ्या लोकांवर ओतून टाकीन. मग मी म्हणेन ‘आता भिंतही नाही आणि तिच्यावर गिलावा करणारेही राहिले नाहीत.’

यहेज्केल 20:8

पण त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली व माझे ऐकण्याचे नाकारले, त्यांनी त्यांच्या त्या भयंकर मूर्ती ऐकल्या नाहीत ते मिसरचे घाणेरडे पुतळे त्यांनी मिसरमध्येच टाकून दिले नाहीत. मग माझ्या रागाचा पारा किती चढतो हे त्यांना कळावे म्हणून मी (देवाने) मिसरमध्येच त्यांचा नाश करण्याचा निश्चय केला.

यहेज्केल 20:11

मग मी त्यांना माझे कायदे शिकविले, माझे नियम घालून दिले. एखाद्याने ते नियम पाळल्यास, तो जगेल.

यहेज्केल 20:13

“पण वाळवंटात इस्राएली लोक माझ्याविरुध्द गेले. त्यांनी माझे नियम पाळले नाहीत. माझे नियम पाळायला त्यांनी नकार दिला. खरे म्हणजे, ते नियम अतिशय चांगले होते. एखाद्याने ते पाळले असते तर तो नक्कीच जगला असता! माझ्या सुट्ट्यांच्या विशेष दिवसांकडे त्यांनी त्यांना काही महत्व नसल्याप्रमाणे दुर्लक्ष केले. पुष्कळ वेळा, त्यांनी त्या दिवशी काम केले. म्हणून माझ्या क्रोधाचा पूर्णाविष्कार दाखविण्यासाठी, त्यांचा वाळवंटात नाश करण्याचा मी निश्चय केला.

यहेज्केल 21:31

मी माझ्या राग तुझ्यावर ओतीन. माझा राग गरम वाऱ्याप्रमाणे तुला भाजून काढील. मी तुला क्रूर माणसांच्याताब्यात देईन. माणसांना ठार मारण्यात ते तरबेज आहेत.

दानीएल 11:36

उत्तरेचा राजा त्याला पाहिजे ते करील. तो स्वत:बद्दल बढाया मारील. तो स्वत: करील. व स्वत:ला देवापेक्षा सुध्दा चांगले समजेल कोणीही ऐकल्या नसतील अशा गोष्टी तो सांगेल. देवांच्या देवाविरुध्द तो अशा गोष्टी सांगेल.सर्व वाईट घडेपर्यंत त्याला यश मिळेल.देवाने घडविण्याचे ठराविलेले घडेलच.

प्रेषितांचीं कृत्यें 13:18

आणि देवाने अरण्यातील चाळीस वर्षांत त्यांना सहनशीलता दाखविली.

प्रकटीकरण 16:1

मग मी मंदिरातून एक मोठा आवाज ऐकला. तो सात देवदूतांना म्हणाला, “जा, पृथ्वीवर देवाच्या रागाच्या सात वाट्याओता.”

Interlinear

Choose Theme