जर त्या लोकांना एखादी गोष्ट आवडली तर ते सरळ जातात आणि ती घेऊन येतात. त्यांना जे काही करायची इच्छा होते ते ते करतात.
Cross references
मावोन येथे तेव्हा एक धनाढ्य माणूस राहात असे. त्याच्याकडे तीन हजार मेंढरे आणि हजार बकऱ्या होत्या. हा एकदा आपल्या मेंढरांची लोकर कातरायला कर्मेल येथे गेला.
अबीगईल नाबालकडे गेली. तो घरीच होता. राजाच्या इतमामात खात पीत होता. मद्याच्या नशेत झिंगला होता व मजेत होता. तेव्हा दुसऱ्या दिवशीपर्यंत ती त्याच्याशी या विषयावर काहीच बोलली नाही.
राजा मग हामानला म्हणाला, “हे धन ठेव. त्या लोकांना तुला काय द्यायचे ते दे.”
“माणूस श्रीमंत आणि धष्टपुष्ट असू शकतो.
ते वाईट लोक देवाचे न ऐकण्याइतके गर्विष्ठ झाले आहेत आणि ते स्वत:च्याच बढाया मारत आहेत.
परमेश्वरा, तुझ्या शक्तीचा उपयोग करुन, या दुष्टांना इहलोकातून नाहीसे कर. परमेश्वरा, तुझ्याकडे मदतीसाठीखूप लोक येतात. त्या लोकांकडे या आयुष्यात फारसे काही नसते. त्या लोकांना खूप अन्न दे. त्यांच्या मुलांना जे काही हवे ते दे. त्यांच्या मुलांना इतके अन्न दे की ते त्यांच्याही मुलांना पुरुन उरेल.
ते गर्विष्ठ लोक दुष्ट आहेत, पण ते श्रीमंत आहेत आणि अधिक श्रीमंत होत आहेत.
ते लोक फार मूर्खआहेत पण मला तुझ्या शिकवणीचा अभ्यास करणे फार आवडते.
चुकीची कृत्ये केल्याची अपराधी भावना लोकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आपल्या पापांबद्दल त्यांना गर्व वाटत आहे. ते सदोम शहरातील रहिवाशांसारखे झाले आहेत. आपली पापे कोण पाहत आहे ह्याची त्यांना पर्वा नाही. हे त्यांच्या दृष्टीने फारच वाईट आहे. त्यांनी स्वत:ला आपत्तीत लोटले आहे.
त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांमुळे ते पुष्ट व लठ्ठ झाले आहेत. त्यांच्या दुष्कृत्यांना अंत नाही. ते अनाथांच्या वतीने बोलणार नाहीत. ते त्यांना मदत करणार नाहीत. ते गरीब लोकांना योग्य न्याय मिळवून देणार नाहीत.
देव म्हणाला, “तुझी बहीण सदोम आणि तिच्या मुली गर्विष्ठ होत्या. त्यांना अन्नधान्याची विपुलता होती आणि त्यांच्याजवळ भरपूर वेळ होता. पण त्यांनी गरिबांना असहाय्य लोकांना मदत केली नाही.
नंतर त्याने त्यास एक बोधकथा सांगितली: “कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीत फार उत्तम पीक आले.