Home Bibles स्तोत्रसंहिता 119:70 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 119:70 · मराठी बायबल

ते लोक फार मूर्खआहेत पण मला तुझ्या शिकवणीचा अभ्यास करणे फार आवडते.

Cross references

स्तोत्रसंहिता 17:10

ते वाईट लोक देवाचे न ऐकण्याइतके गर्विष्ठ झाले आहेत आणि ते स्वत:च्याच बढाया मारत आहेत.

स्तोत्रसंहिता 40:8

माझ्या देवा, तुझे मानस पूर्ण करण्यात मला आनंद आहे मी तुझी शिकवण अभ्यासली आहे.

स्तोत्रसंहिता 73:7

जर त्या लोकांना एखादी गोष्ट आवडली तर ते सरळ जातात आणि ती घेऊन येतात. त्यांना जे काही करायची इच्छा होते ते ते करतात.

स्तोत्रसंहिता 119:16

मला तुझे नियम आवडतात. मी तुझे शब्द विसरणार नाही.

स्तोत्रसंहिता 119:35

परमेश्वरा, मला तुझ्या आज्ञांच्या मार्गाकडे घेऊन जा. मला जीवन जगायचा तो मार्ग अगदी मनापासून आवडतो.

यशया 6:10

लोकांना गोंधळात टाक, लोक जे ऐकतील आणि पाहतील ते त्यांना समजणार नाही असे कर. तू असे केले नाहीस तर कदाचित् लोक जे कानांनी ऐकतील आणि डोळ्यांनी पाहतील, तेच खरे समजतील. असे जर झाले तर ते मला शरण येतील आणि बरे होतील.”

प्रेषितांचीं कृत्यें 28:27

कारण या लोकांचे विचार मंद झाले आहेत त्याच्या कानांनी त्यांना ऐकू येत नाही. आणि त्यांनी आपले डोळे बंद केले आहेत नाहीतर त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले असते आणि आपल्या कानांनी ऐकले असते आणि माझ्याकडे वळाले असते आणि मी त्यांना बरे केले असते.’

रोमकरांस 7:22

माझ्या आत असलेला मनुष्य देवाच्या नियमशास्त्रामुळे आनंद करतो.

Interlinear

Choose Theme