देवा, तू मला दुष्ट लोकांपासून वाचव. मला वाईट, पापी लोकांपासून वाचव.
Cross references
अहिथोफेल त्याला म्हणाला, “घराची राखण करायला तुझ्या वडीलांनी त्यांच्या दासी येथेच ठेवल्या आहेत. त्यांच्याशी तू संबंध ठेव मग तुझ्या वडीलांना तुझा तिरस्कार वाटतो ही गोष्ट सर्व इस्राएलांमध्ये पसरेल. त्यामुळे त्या सर्वांचा तुला पाठींबा मिळेल.”
शिवाय अहिथोफेलने अबशालोमला सांगितले, “मला आता बाराहजार माणसांची निवड करु दे म्हणजे आज रात्रीच मी दावीदाचा पाठलाग करतो.
दावीद जेथे लपला असेल तेथून आम्ही त्याला धरून आणू. जमिनीवर दव पडावे तसे आम्ही त्याच्यावर तुटून पडू. दावीदाला त्याच्या बरोबरच्या माणसांसहित आम्ही ठार करु. कुणालाही सोडणार नाही.
इकडे अबशालोमचे नोकर निघून जातात, तो योनाथान आणि अहीमास विहिरीतून बाहेर पडले. तडक राजा दावीदाकडे जाऊन ते त्याला म्हणाले, “असाल तसे निघा आणि नदी ओलांडून पलीकडे जा. अहिथोफेलने तुमच्याविरुध्द असे असे सांगितले आहे.”
तुझ्या डोळ्यातल्या बुब्बुळाप्रमाणे माझे रक्षण कर. मला तुझ्या पंखाच्या सावली खाली लपव.
परमेश्वरा, ऊठ! आणि शत्रूकडे जा. त्यांना शरण यावयास लाव. तुझ्या तलवारीचा उपयोग कर. आणि मला दुष्टापासून वाचव.
देवा तुला न अनुसरणारा एक माणूस इथे आहे. तो कपटी आहे आणि तो खोटे बोलतो देवा मी बरोबर आहे हे सिध्द कर. माझा बचाव कर. मला त्या माणसापासून वाचव.
देवा, मला माझ्या शत्रूंपासून वाचव माझ्याशी लढायला जे लोक आले आहेत त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी मला मदत कर.
परमेश्वरा, मला दुष्ट लोकांपासून वाचव दुष्टांपासून माझे रक्षण कर.