Home Bibles स्तोत्रसंहिता 96:1 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 96:1 · मराठी बायबल

परमेश्वराने ज्या नवीन गोष्टी केल्या त्यांची स्तुती करण्यासाठी नवे गाणे गा. सगळ्या जगाने परमेश्वराच्या स्तुतीचे गाणे गावे.

Cross references

1 इतिहास 16:23

पृथ्वीवरील समस्त लोकहो, परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराने आपल्याला वाचवल्याची शुभवार्ता रोज सर्वांना सांगा.

स्तोत्रसंहिता 33:3

त्याच्यासाठी नवे गाणे गा. आनंदीहून चांगल्या रीतीने वाजवा.

स्तोत्रसंहिता 66:4

सगळ्या जगाला तुझी उपासना करु दे प्रत्येकाला तुझ्या नावाचा महिमा गाऊ दे.

स्तोत्रसंहिता 67:3

देवा, लोक तुझी स्तुती करु देत, सर्व लोक तुझी स्तुती करु देत.

स्तोत्रसंहिता 68:32

पृथ्वीवरच्या राजांनो, देवासाठी गाणे म्हणा, त्याच्यासाठी स्तुतिगीत गा.

स्तोत्रसंहिता 98:1

परमेश्वराने नवीन आणि अद्भुत गोष्टी केल्या म्हणून त्याच्यासाठी नवीन गाणे गा.

स्तोत्रसंहिता 149:1

परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने ज्या नवीन गोष्टी केल्या त्याबद्दलचे नवे गाणे गा. ज्या सभेत त्याचे भक्त भेटतात त्या सभेत त्याचे गुणगान करा.

रोमकरांस 15:11

आणि पुन्हा शास्त्र असे म्हणते. “अहो सर्व विदेशी लोकांनो, प्रभूचे स्तवन करा आणि सर्व लोक त्याची स्तुति करोत.” स्तोत्र. 117:1

प्रकटीकरण 5:9

आणि त्यांनी नवे गाणे गाईले:“तू गुंडाळी घेण्यास आणि तिचे शिक्के उघडण्यास समर्थ आहेस, कारण तुला वधण्यात आले आणि तू आपल्या रक्तानेमनुष्यांना प्रत्येक वंशातून, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या जमातीतून, आणि राष्टांतून विकत घेतले.

प्रकटीकरण 14:3

ते लोक सिंहासनासमोर आणि चार जिवंत प्राण्यांसमोर आणि वडिलांसमोर नवे गीत गात होते. जे लोक पृथ्वीपासून मुक्तकरण्यात आलेले, असे 1,44,000 तेच हे गाणे शिकू शकले. त्यांच्याशिवाय दुसरे कोणीही ते गीत शिकू शकले नाही.

Interlinear

Choose Theme